बुडाल्याने बालकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 5, 2017 19:07 IST2017-06-05T19:07:15+5:302017-06-05T19:07:15+5:30

बोरगावमंजू: पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सांगळूद अंबादेवी येथील १५ वर्षीय बालकाचा बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना ५ जून रोजी दुपारी घडली.

The death of the child due to dropping | बुडाल्याने बालकाचा मृत्यू

बुडाल्याने बालकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगावमंजू: पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सांगळूद अंबादेवी येथील १५ वर्षीय बालकाचा बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना ५ जून रोजी दुपारी घडली. या प्रकरणी बोरगावमंजू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
सांगळूद अंबादेवी येथील पवन मोहन सामरकर हा गावातील लोणार नदीच्या पात्रात गेला होता. यावेळी त्याचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. त्या पोहणे येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अरुण सिरसाट यांनी बोरगावमंजू पोलिसांना माहिती दिली. हेकॉ अरुण गावंडे, आंबेकर यांनी घटनास्थळावर भेट देउन पंचनामा केला. तसेच आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास बोरगामवंजू पोलीस करीत आहेत.

Web Title: The death of the child due to dropping