वाहनाच्या धडकेत खवल्या मांजराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2016 02:34 IST2016-09-24T02:34:06+5:302016-09-24T02:34:06+5:30

खामगाव एमआयडीसी परिसरातील घटना.

The death of the carrot in the wheel of the vehicle | वाहनाच्या धडकेत खवल्या मांजराचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत खवल्या मांजराचा मृत्यू

खामगाव (जि. बुलडाणा), दि. २३- स्थानिक एमआयडीसी भागात अज्ञात वाहनाच्या धडकेत खवल्या मांजराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. एमआयडीसीमध्ये उद्योग असलेले सुटाळा बु. येथील मनोज वानखडे हे कारखान्यात जात असताना त्यांना रस्त्यावर दुर्मीळ प्राणी असलेले खवले मांजर मृत अवस्थेत आढळले. याबाबतची माहिती त्यांनी वन विभागाला कळविल्यानंतर वन विभागाचे टी.एन. साळुंके, गीते, एस.एस. देशमुख यांनी मृत खवले मांजर ताब्यात घेतले. यावेळी ह्यतरुणाईह्णचे राजेंद्र कोल्हे व इतर उपस्थित होते.

Web Title: The death of the carrot in the wheel of the vehicle