अमेरिकेतही ठिकठिकाणी साजरा होणार ‘श्रीं’चा प्रकट दिन!

By Admin | Updated: February 18, 2017 03:25 IST2017-02-18T03:25:28+5:302017-02-18T03:25:28+5:30

श्रीं’चा प्रकट दिन उत्सव १८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे.

The day will be celebrated in America as well! | अमेरिकेतही ठिकठिकाणी साजरा होणार ‘श्रीं’चा प्रकट दिन!

अमेरिकेतही ठिकठिकाणी साजरा होणार ‘श्रीं’चा प्रकट दिन!

गजानन कलोरे
शेगाव, दि. १७- संत गजानन महाराजांचा प्रकट दिन केवळ महाराष्ट्रापुरता र्मयादित राहिला नसून, अमेरिकेत यावर्षीदेखील ह्यश्रींह्णचा प्रकट दिन उत्सव १८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे.
अमेरिकेतील ह्यगजानन भक्त परिवारह्ण यांच्यावतीने गत काही वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन अमेरिकेतील प्रमुख शहरांमध्ये करण्यात येते. यावर्षीदेखील अमेरिकेतील विविध शहरात १0 ठिकाणी ह्यश्रींह्णचा प्रकट दिन उत्सव साजरा होणार आहे. तेथील प्रकट दिन सोहळा अमेरिका पूर्व वेळेनुसार सायंकाळी ५ वाजतापासून सुरु होईल. या सोहळ्यांचे आयोजन अमेरिकेतील अटलांटा (जीए) श्री गजानन महाराज मंदिर ( श्री सत्य नारायण स्वामी मंदिर ) क्युरी ड्राइव्ह, अल्फारेटा (जीए), बोस्टन (एमए) २५ ग्रेपवाइन अव्हेन्यु, लेक्झींगटन, डल्लास (टीएक्स), न्यू जर्सी (एनजे), जॉन एफ केनेडी, जर्सी रोड, सिएटल (डब्ल्यूए) श्री साईबाबा मंदिर रेड्मोंड, ओर्लान्डो (एफएल) चिन्मय मिशन, सिसेल्बेरी, एफेल, लॉस एंजेलिस (सीए) टोरांस येथे आयोजित करण्यात आला. सोबतच ओंटारिओ (कॅनडा), मिसिसौगा (ओंटारीओ सिटी) कॅनडा, पोर्टलंड (ओआर) तुअलातीन/शेरवूड (ओआर) या ठिकाणी तसेच युरोपातही लंडन येथेही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
काकड आरती, पारायण, शेजारती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे. अमेरिकेतील श्रींचे भक्त त्यांच्या परिवार व मित्रमंडळीसहित हजारोंच्या संख्येने यात सहभागी होणार आहेत. उत्सवासाठी सहभागी होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

Web Title: The day will be celebrated in America as well!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.