शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दिन विशेष : लाचखोरी प्रतिबंधक कारवाईत पुणे अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:27 IST

ज्यात गत ११ महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक कारवाया पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने करून प्रतिबंधक कारवायामध्ये पुणे अव्वल आले आहे.

ठळक मुद्देपुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १८० सापळे रचले असून, १८४ लाचखोरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने याच कालावधीत ११९ सापळे रचले.औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा असून, त्यांनी या कालावधीत १०८ सापळे रचून १११ लाचखोरांविरुद्ध कारवाई केली आहे.

- सचिन राऊत

 अकोला: राज्यातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विविध उपक्रम राबवित जनजागृती करून लाचखोरांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न होत असतानाच राज्यात गत ११ महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक कारवाया पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने करून प्रतिबंधक कारवायामध्ये पुणे अव्वल आले आहे, तर मुंबईची सपशेल माघार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.राज्यातील आठ विभागात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या कारवाईमध्ये पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १८० सापळे रचले असून, १८४ लाचखोरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्या पाठोपाठ नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने याच कालावधीत ११९ सापळे रचले असून १३४, तर तिसऱ्या क्रमांक औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा असून, त्यांनी या कालावधीत १०८ सापळे रचून १११ लाचखोरांविरुद्ध कारवाई केली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या ११ महिन्यांच्या कालावधीत ९७ सापळे रचून १०१ गुन्हे नोंदविले आहेत, तर अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ९६ सापळे रचून ९९ लाचखोरांविरुद्ध कारवाई केली आहे. नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ८३ सापळे रचून ८५ जणांविरुद्ध कारवाई करीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. राज्यात सर्वात कमी कारवाया सर्वात मोठा जिल्हा आणि मंत्रालय असलेल्या मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात झालेल्या आहेत. मुंबई विभागात केवळ ४४ कारवाया झाल्याचे वास्तव आहे. राज्यात ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८६८ लाचखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचखोरांना ताळ्यावर आणण्यास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खाते अव्वल स्थानावर आहे.२५२ प्रकरणात दोषारोपपत्र दाखलराज्यात गत ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८६८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, यापैकी २५२ प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. यामध्ये औरंगाबाद विभागाने ५४ प्रकरणांचे दोषारोपपत्र दाखल केले असून, पुणे विभागाने ५१, मुंबई विभागाने ४, नांदेड विभागाने ३८, ठाणे विभागाने ११, नागपूर ३४, नाशिक ३१ तर अमरावती विभागाने २९ प्रकरणांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहेत. अमरावती विभाग ढिम्मअमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई अन्य विभागाच्या तुलनेत ढिम्म असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. कारवाया वाढविण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून उपक्रम राबविण्यात येत असतानाही अमरावती विभागाच्या कारवाया मात्र कमी आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाPuneपुणेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग