एक पहाट - निर्मळ विचारांची

By Admin | Updated: October 28, 2014 00:49 IST2014-10-28T00:49:05+5:302014-10-28T00:49:05+5:30

‘लोकमत’चा नेहरु पार्कमध्ये अनोखा दीपोत्सव.

A dawn - pure ideas | एक पहाट - निर्मळ विचारांची

एक पहाट - निर्मळ विचारांची

अकोला : एक पहाट क्रांतीची.. एक पहाट विचारांची.. एक पहाट समृद्घीची.. एक पहाट बदलांची.. एक पहाट सर्मपणाची.. एक पहाट तुमच्या आमच्या मनातील निर्मळ विचारांचीह्ण हा संदेश देत गुरुवार, २३ ऑक्टोबरला ह्यलोकमतह्णच्या वतीने अनोखा दीपोत्सव नेहरू पार्क येथे पार पडला. सामाजिक विचारांच्या आदान-प्रदानासोबतच पहाटे वाहणार्‍या शीतल वार्‍यासोबतच सुमधुर संगीताची मैफील रसिकांना एक वेगळाच आनंद देऊन गेली.
लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट, बाल विकास मंच, नेहरू पार्क, शंकर साउंड सर्व्हिस, नाना उजवणे परिवार, प्रवीण क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळीनिमित्त ह्यदिवाळी पहाटह्ण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या रम्य पहाटे वातावरणात हवाहवासा गारवा असताना नेहरू पार्कच्या हिरव्यागार लॉनवर दीपोत्सवाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पहाटे ५ वाजता हजारोंच्या संख्येने पणत्या लावण्यात आल्या होत्या. या पणत्यांच्या प्रकाशाने संपूर्ण नेहरू पार्क उजळून टाकले होते. वासुदेवाच्या रूपात आलेल्या भक्ती ठक्कर हिने एक पणती लावून यास सुरुवात केली. नंतर सर्व उपस्थितांनी पणत्या लावून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या पणत्यांच्या माध्यमातून ह्यपाणी वाचवाह्ण हा जनजागृतीपर संदेश देणारा उत्कृष्ट देखावा जितेंद्र डहाके यांनी सादर केला. उ त्कृष्ट रांगोळय़ा काढून प्रवीण पवार यांनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली होती.

Web Title: A dawn - pure ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.