दिग्रस येथे दाेन घरी धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:08+5:302021-06-09T04:24:08+5:30

गावातील उत्तम पुंडलिक गावंडे यांच्या घरातील आईच्या गळ्यातील एकदाणी, तर रोख रक्कम व सुभाष बराटे यांच्या घरातील पाच हजार ...

Daring burglary at Daen's home in Digras | दिग्रस येथे दाेन घरी धाडसी चोरी

दिग्रस येथे दाेन घरी धाडसी चोरी

गावातील उत्तम पुंडलिक गावंडे यांच्या घरातील आईच्या गळ्यातील एकदाणी, तर रोख रक्कम व सुभाष बराटे यांच्या घरातील पाच हजार नगदी रोख लंपास केले.

गावातील उत्तम गावंडे यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची एकदाणी चोरट्यांनी तोडून नेली. महिलेला जाग येताच, चोरट्यांनी महिलेला मारण्याची धमकी दिली. यासोबतच चोरट्यांनी सुभाष बराटे यांच्या घरात शिरून रोख पाच हजार रुपये चोरून नेले. या घटनेबाबत सुधाकर कराळे, पोलीस पाटील नितीनकुमार गवई यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. चोरीचा तपास करण्यासाठी श्वान पथक, ठसेतज्ज्ञांसह स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. या महिन्यातील चोरीची ही दुसरी घटना असल्याने गावात भीतीचे आहे.

चोरांना लागला विजेचा धक्का

चोरट्यांनी गावातील एक शेतातून जाण्याचा मार्ग शोधला; परंतु शेताच्या बांधांवरील विद्युत तारांचा जोराचा धक्का बसल्याने, चोरटे ओरडले. त्यांचा आवाज ग्रामस्थांच्या कानावर गेला. ग्रामस्थ आवाजाच्या दिशेने धावले; परंतु अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. बसस्थानक परिसरात असलेल्या अजित ताले यांची दुचाकीसुद्धा चोरट्यांनी चोरून नेली.

Web Title: Daring burglary at Daen's home in Digras