दोन अज्ञात भामट्यांकडून ग्रामस्थांची दिशाभूल
By Admin | Updated: April 30, 2015 01:54 IST2015-04-30T01:54:03+5:302015-04-30T01:54:03+5:30
पंचायत समितीच्या अधिका-यांनी केले सावध राहण्याचे आवाहन.

दोन अज्ञात भामट्यांकडून ग्रामस्थांची दिशाभूल
अकोला- म्हैस पालन योजनेकरिता तुमची निवड झाली असून, लाभ घेण्यासाठी १५२00 रुपये भरणा करावयाचा आहे. पैसे भरल्यानंतर पंचायत समितीमधून तुम्हाला लाभ दिला जाईल, अशा भूलथापा देत सध्या जिल्हय़ात दोन भामटे क्रमांक नसलेल्या दुचाकीवरून फिरत आहेत. याबाबतची तक्रार खुद्द ग्रामस्थांनीच अकोला पंचयात समिती कार्यालयात केली. अशाप्रकारे कोणतीही योजना जिल्ह्यात राबविली जात नसून, ग्रामस्थांनी अशा भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन अधिकार्यांनी केले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतर्फे ग्रामीण भागातील गोर-गरीब जनतेसाठी विविध लाभार्थी योजना राबविल्या जातात.
काही योजना १00 टक्के अनुदानावर, तर काही योजना लाभार्थी हिस्सा भरून राबविल्या जातात. शासनाच्या काही योजना राबविण्याची जबाबदारीही या यंत्रणांवर असते.
याचाच लाभ घेऊन जिल्ह्यात काही भामट्यांनी ग्रामस्थांची फसवणूक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अशाच दोन भामट्यांनी पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील रामगाव, कट्यार, हिंगणी बु., मिर्झापूर, दाळंबी आदी गावातील गावकर्यांशी सं पर्क साधून त्यांना भूलथापा देत पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लाभार्थी योजनेंतर्गत तुमची निवड झाली असून, ४0 हजार रुपये किमतीची म्हैस तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातर्फे निवड झालेल्या यादीत तुमचे नाव असून, त्यासाठी १५ हजार २00 रुपयांची मागणी केली जाते.
गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना त्यासाठी ह्यटार्गेटह्ण केले जात आहे. पैसे दिले नाही, तर पंचायत समि तीमध्ये येऊन भरणा करा, आम्ही तुम्हाला तेथेच भेटू, असे सांगून हे भामटे निघून जातात.
ग्रामस्थ जेव्हा पंचायत समितीमध्ये येतो, तेव्हा तेथे या दोघांपैकी कुणीही आढळून येत नाही. त्यामुळे थेट अधिकारी, कर्मचार्यांकडे ग्रामस्थांनी विचारणा केली असता, अशी कोणतीही योजनाच राबविली जात नसल्याचे सांगण्यात आल्यावर आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते. गेले पंधरा दिवसांमध्ये अकोला पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात अशाप्रकारे विचारणा करीत काही ग्रामस्थ आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर अधिकार्यांनी ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.