नदीकाठच्या गावांना धोकाः भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST2021-07-23T04:13:19+5:302021-07-23T04:13:19+5:30
पाटबंधारे विभागाने पावसाळा लक्षात घेता, गेट दुरुस्तीवर भर देणे गरजेच होते. सातपुडा जंगलात सर्व नद्या एकत्र येत असलेल्या ठिकाणी ...

नदीकाठच्या गावांना धोकाः भीतीचे वातावरण
पाटबंधारे विभागाने पावसाळा लक्षात घेता, गेट दुरुस्तीवर भर देणे गरजेच होते.
सातपुडा जंगलात सर्व नद्या एकत्र येत असलेल्या ठिकाणी पोपटखेड येथे धरण बांधले आहे. पाणी साठा जास्त होत असल्याने धरणाचे दुसरा टप्पा बांधकाम करीत धरणाचे परिक्षेत्र वाढवले. तरीसुद्धा धरण भरत आहे. अशात पोपटखेड धरणावरील गेट नंबर दोन सताड उघडे दिसत आहे. परंतु पावसाळ्यात दोन नंबर गेट पूर्णतः उघडे असल्याने सदर गेटचे लाॅक तुटल्याची माहिती पुढे येत आहे. अद्यापही प्रशासनाने याबाबत नदीकाठच्या गावकऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला नाही. जंगलात जोरदार पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने चालढकल न करता धरणाच्या कामाची व पाण्याच्या पातळीबाबत चौकशी करून नागरिकांना माहिती देणे गरजेचे आहे.
फोटो: