शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

रस्त्यांवर सडलेल्या फुलांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 1:36 PM

सडक्या फुलांसह प्लास्टिक पिशव्या व इतर केरकचºयाचे ढीग साचून असल्याचे चित्र अकोलेकरांना पाहावयास मिळाले.

अकोला: दिवाळीनिमित्त शहरात विविध फुलांची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पावसाने सळो की पळो करून सोडले. सलग बरसणाºया पावसामुळे शेतकºयांना मातीमोल भावाने फुलांची विक्री करावी लागली. त्यामुळे नाइलाजाने शेतकºयांना फुले, केळीची पाने तशीच रस्त्यालगत टाकून द्यावी लागली. एरव्ही रात्री दहानंतर मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेचा गवगवा करून सोशल मीडियावर स्वत:ची पाठ थोपटून घेणारा मनपाचा स्वच्छता विभाग मुख्य रस्त्यांकडे फिरकलाच नसल्यामुळे सोमवारी शहरातील मुख्य रस्त्यांवर सडक्या फुलांसह कचºयाचा खच साचल्याचे किळसवाणे चित्र पाहावयास मिळाले.मागील सहा दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्याचा परिणाम दिवाळी सणावर दिसून आला. शहरात दिवाळीच्या पूजनानिमित्त विविध रंगबेरंगी व आकर्षक फुलांची विक्री करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपºयातील शेतकरी दाखल झाले होते. तसेच लक्ष्मी मूर्ती, पणत्या, मडके, लाह्या, बत्तासे, झाडू, केळीची व आंब्याच्या पानांची विक्री करण्यासाठी किरकोळ व्यावसायिकांनी मुख्य रस्त्यांवर दुकाने थाटली होती. सलग बरसणाºया पावसामुळे शेतकºयांसह किरकोळ व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात फुले सडल्याने शेतकºयांना मातीमोल भावाने फुलांची विक्री करावी लागली. तसेच यंदा बाजारात फुलांची जास्त आवक झाल्यामुळे अनेक शेतकºयांनी आणलेली फुले रस्त्यालगत तशीच टाकू न द्यावी लागली. फुलांसह विविध साहित्याचा रस्त्यालगत खच साचल्याची परिस्थिती निर्माण झाली असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी ६ वाजतापासूनच साफसफाईच्या कामाला प्रारंभ करणे अपेक्षित होते. या परिस्थितीची जाणीव असतानासुद्धा मनपाचा आरोग्य व स्वच्छता विभाग दिवसभर फिरकलाच नाही, हे विशेष.सणासुदीच्या दिवसांत स्वच्छता कागदावरमनपा प्रशासनासह सत्ताधारी भाजपच्यावतीने शहरात स्वच्छतेच्या कामाचा गवगवा केला जात असतानाच ऐन सणासुदीच्या दिवसांत शहराच्या गल्लीबोळांसह मुख्य बाजार तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरल्याचे चित्र आहे. साफसफाईच्या मुद्यावर स्वच्छता विभागाचा कारभार हवेत सुरू असून, मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात सत्तापक्ष सपशेल अपयशी ठरल्याचा सूर अकोलेकरांमधून उमटत आहे.

सत्तापक्षासह प्रशासन कुंभकर्णी झोपेतयंदाच्या दिवाळी सणावर पावसाचे सावट दिसून आले. रविवारी दिवाळी साजरी झाल्यानंतर सोमवारी सकाळी मनपाच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने कामाला लागणे क्रमप्राप्त होते. मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी सडक्या फुलांसह प्लास्टिक पिशव्या व इतर केरकचºयाचे ढीग साचून असल्याचे चित्र अकोलेकरांना पाहावयास मिळाले. हा प्रकार पाहता सत्ताधारी भाजपसह प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप अकोलेकरांमधून होत आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला