शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी
2
भीषण अपघात! आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी
3
BAN vs SL : १२५ धावांचे लक्ष्य पण संघर्ष मोठा; अखेर बांगलादेशचा विजय, श्रीलंकेचा दुसरा पराभव
4
"आता माझ्या कंपन्या भारतात..."! पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत काय म्हणाले इलॉन मस्क?
5
AFG vs NZ Live : 75 ALL OUT! अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडला लोळवलं; राशिद-नबीने सामना गाजवला
6
Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
AFG vs NZ : अफगाणिस्ताननं इतिहास रचला! पहिल्यांदाच न्यूझीलंडला घाम फोडला, राशिदच्या संघानं गड जिंकला
8
महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार
9
स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी
10
‘नीट’ निकालाची सीबीआय चौकशी करा, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह ‘आयएमए’ची देखील मागणी
11
आजचे राशीभविष्य : 08 जून 2024; धन व कीर्ती ह्यांची हानी होईल, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
12
तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला
13
...म्हणून भारताला पाकिस्तानविरूद्ध नक्कीच फायदा होईल; सिद्धूंनी सांगितला खेळ भावनांचा
14
T20 World Cup 2024 : आयर्लंडला हरवून कॅनडानं रचला इतिहास; आता 'लक्ष्य' पाकिस्तान, दिला इशारा
15
Tarot Card: उक्तीला कृतीची जोड हवी, या जबाबदारीची जाणीव करून देणारा आठवडा!
16
विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास 
17
केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा
18
अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!
19
‘मोठा भाऊ’वरून पटोलेंना पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्या; महाविकास आघाडीत संघर्ष वाढण्याआधीच काँग्रेस सावध
20
ईव्हीएममुळे विरोधकांची बोलती बंद, ‘एनडीए’चेच मजबूत आघाडी सरकार - नरेंद्र मोदी

मूर्तिजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ७०० हेक्टरच्यावर शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 5:09 PM

Rain in Murtijapur : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच ८ महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या ७०० हेक्टरच्यावर शेतीवरील पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

-संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यात ६-७ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्वच ८ महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या ७०० हेक्टरच्यावर शेतीवरील पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाच्या हवाल्या नुसार ४४३ हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.      दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात कहर केला आहे अनेक गावात घरात पाणी शिरले तर पावसामुळे ३४ घरांची पडझड झाली आहे. नदी - नाल्यांना पुर आल्याने त्या काठावरील जमीन पाण्याखाली आल्याने पीकाचे नुकन झाले आहे. त्याच बरोबर इतर महसूल मडळातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतीला बांध घातले आहेत अशा शेतकऱ्यांची शेती सुरुवातीपासूनच तुंबलेली आहे, शेतीच्या बांधमुळे शेतातील पाणी वाहून जात नसल्याने शेताला तलावाचे स्वरुप आल्याने पीके पाण्याखाली आली असल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.                 शासनाने तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष तपासणी करावी व शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरRainपाऊसagricultureशेती