शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धरणे भरली, पण कॅनॉलची देखभाल दुरुस्ती रखडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:40 IST

अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे यावर्षी ही कामे लांबल्याने पाणी सोडण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील धरणात यावर्षी मुबलक जलसाठा आहे; परंतु रब्बी हंगामातील पिकांना पाणी सोडण्यासाठी कॅनॉलच्या देखभाल दुरुस्तीची कामेच रखडल्याने १० डिसेंबरपासून पाणी सोडणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून, अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे यावर्षी ही कामे लांबल्याने पाणी सोडण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यावर्षी उशिरा धरणे भरली आहेत. त्यामुळे कॅनॉलची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी भरपूर वेळ होता. तसेही आतापर्यंत ही देखभाल दुरुस्तीची कामे होणे गरजेचे होते.याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने पाणी उपलब्ध असूनही कॅनॉलच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाअभावी पाणी सोडण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीऐवजी पाणी सोडले तर पाण्याचा मोठा अपव्यव होणार असल्याने या कामाकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. पावसाळा सुरू होताबरोबर या कामाची निविदा काढणे व इतर संबंधित कामाची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते; परंतु यावर्षी विलंब झाला आहे.अकोला शहराला पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा प्र्रकल्पात जुलै महिन्यापर्यंत ५ टक्केच जलसाठा शिल्लक राहिल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट अकोलेकरांवर उभे ठाकले होते. इतरही सर्वच धरणांचा जलसाठा तळाला लागला होता. तथापि, सप्टेंबर महिन्यापासून सतत व दमदार पाऊस पडला. परतीच्या पावसाने त्यामध्ये आणखी भर घातल्याने जिल्ह्यातील उमा व घुंगशी प्रकल्प वगळता सर्वच मोठे, मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाले. अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान प्रकल्पातून आजमितीस जेवढे पाणी उपलब्ध आहे, त्याच्या दुप्पट विसर्ग करण्यात आला.काटेपूर्णा प्रकल्पाचे वक्रद्वार उघडण्यात आले होते. इतरही मध्यम प्रकल्पातून विसर्ग करण्यात आला. अकोला पूर संरक्षण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पातून बांधले, तेव्हापासून दुसºयांदा विसर्ग करण्यात आला. आजमितीस काटेपूर्णा व वान या मोठ्या प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे.मोर्णा, निर्गुणा मध्यम प्रकल्पातही शंभर टक्के जलसाठा असून, उमा प्रकल्पात ८७.६७ तर घुंगशी बॅरजेमध्ये ८८.७१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी असल्याने सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. तथापि, कॅनॉलच्या देखभाल दुरुस्तीची कामे अद्याप झाली नसल्याने सिंचनाला पाणी मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. काटेपूर्णा प्रकल्पातून आठ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी सोडण्यात येत असते. यावर्षी या प्रकल्पातून रब्बी हंगामात शेतकºयांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतीला पाणी सोडण्यात येणार आहे. वान प्रकल्पातूनही किंबहुना दरवर्षीप्रमाणे पूर्ण क्षमतेने सिंचन करण्यावर भर देण्यात आला आहे.अकोला उपविभागांतर्गत मोर्णा, निर्गुणा व दगडपारवा प्रकल्पातून १२ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. उमा व घुंगशी बॅरेजमधून रब्बी हंगामाला पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी हे सर्व प्रकल्प मिळून ३८ हजार हेक्टरवर सिंचन व्यवस्था अपेक्षित असल्याचे पाटबंधारे विभागाचे अभियंता चिन्मय वाकोडे यांनी सांगितले.

काटेपूर्णा धरण कॅनॉलच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे वाटप पत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच देखभाल दुरुस्तीच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.- अभिजित नितनवरे,उपअभियंता,काटेपूर्णा प्रकल्प.

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प