सिलिंडरधारकांना मिळेना केरोसिन
By Admin | Updated: March 29, 2016 02:10 IST2016-03-29T02:10:09+5:302016-03-29T02:10:09+5:30
सिलिंडरधारक शिधापत्रिकाधारकांची केरोसिनसाठी पायपीट

सिलिंडरधारकांना मिळेना केरोसिन
अकोला: गॅस सिलिंडर सवलत (सबसिडी) योजना लागू झाल्यापासून सिलिंडरधारक शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत केरोसिन बंद झाले आहे. त्यामुळे एकच सिलिंडर असलेल्या शिधापत्रिकाधारकांना केरोसिनसाठी पायपीट करावी लागत आहे.
गॅस सिलिंडरधारकांसाठी वर्षभरात १२ सिलिंडर सवलतीच्या दरात (सबसिडी) देण्याचा निर्णय केंद्र शासनामार्फत घेण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत एक व दोन सिलिंडरधारक शिधापत्रिकाधारकांना दरमहा वितरित करण्यात येणारे केरोसिन बंद करण्याचा निर्णय २0 ऑगस्ट २0१५ रोजी राज्य शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, सिलिंडरधारकांना केरोसिनचे वितरण बंद करण्यात आले. या निर्णयाने ज्यांच्याकडे एक सिलिंडर आहे, त्यांची चांगलीच पंचाईत होत आहे. ज्यांच्याकडे एकच गॅस सिलिंडर आहे, त्यांना सिलिंडर वेळेवर न मिळाल्यास स्वयंपाक व इतर उपयोगासाठी रास्त भाव दुकानांमध्ये केरोसिन मिळत नाही. त्यामुळे केरोसिनसाठी त्यांना पायपीट करावी लागत आहे.
तीन जिल्ह्यात सिलिंडरधारक केरोसिनसाठी पात्र शिधापत्रिकाधारक!
जिल्हा एकूण शिधापत्रिकाधारक एक सिलिंडरधारक केरोसिनसाठी पात्र शिधापत्रिकाधारक
अकोला ३५४३९२ ११३७२५ २२७५६२
बुलडाणा ५१३७६0 १३३४८७ ३४६६४२
यवतमाळ ५९४१६४ १८६७८९ ३३३४८५