कारच्या धडकेत सायकलस्वार ठार
By Admin | Updated: February 27, 2015 00:37 IST2015-02-27T00:37:22+5:302015-02-27T00:37:22+5:30
अकोला येथील घटना; गुन्हा दाखल.

कारच्या धडकेत सायकलस्वार ठार
अकोला: कारने दिलेल्या धडकेमध्ये सायकलस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री १२.३0 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील गौतमनगरात राहणारे मुकुंदा नामदेव वानखडे (५८) हे बुधवारी रात्री एमआयडीसीमधून घरी परतत असताना, त्यांच्या सायकलला एमएच 0२ बीटी २६२५ क्रमांकाच्या कारने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर धडक दिली. यात मुकुंद वानखडे हे गंभीर जखमी झाले. सिव्हिल लाइन पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळावर जाऊन जखमीला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी ते मरण पावल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.