सायकल यंत्राने तीन एकर शेतीची डवरणी

By Admin | Updated: August 6, 2014 00:19 IST2014-08-05T22:43:34+5:302014-08-06T00:19:12+5:30

शेतकर्‍याने सायकल यंत्राने आपल्या तीन एकर शेतीची डवरणी केली.

The cycle machinery has three acres of farming | सायकल यंत्राने तीन एकर शेतीची डवरणी

सायकल यंत्राने तीन एकर शेतीची डवरणी

पळशी बु.: आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या पळशी बु. येथील शेतकर्‍याने सायकल यंत्राने आपल्या तीन एकर शेतीची डवरणी केली. या यंत्रामुळे या शेतकर्‍याचा मशागतीचा खर्च वाचला. स्थानिक ५५ वर्षीय शेतकरी महादेव ज्योतीराम अंभोरे यांचेकडे या गावाला लागून तीन एकर शेती आहे. यंदा त्यांनी आपल्या शेतात एक एकर सोयाबीन, एक एकर ज्वारी, तसेच उडीद व मुंग या वानाची ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली. पेरणी केलेले पीक जमिनीवर आल्यानंतर पिकाला डवरणी व निंदणी करावी लागते. मात्र, डवरणीसाठी पैसे नसल्यामुळे पळशी खुर्द येथील शेतकरी महादेव ज्योतीराम अंभोरे यांनी आपल्या तीन एकर शेताची सायकल डवरणी यंत्राचा वापर करून डवरणी केली. या डवरणी यंत्रामुळे शेतकर्‍याचे मशागतीचे पैसे वाचले. आर्थिक संकटातून बचाव व्हावा म्हणूनच या शेतकर्‍याने सायकल डवरणी यंत्राचा वापर केला.

Web Title: The cycle machinery has three acres of farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.