शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

पातूर बनतेय ‘सीताफळ नगरी ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 11:50 AM

Custurd Apple become Famous पातूरची बाजारपेठ सीताफळांनी बहरली आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत फळशेतीला अधिक पसंती दिली आहे.पातूरची बाजारपेठ सीताफळांनी बहरली आहे. परजिल्ह्यातील व्यापारी शहरांमधून सीताफळाच्या खरेदीसाठी येत आहेत.

- संतोषकुमार गवई लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : पातूर हे ठिकाण ऐतिहासिक असून, अनेक बाबींसाठी प्रसिद्ध आहे. आता याच बरोबर पातूरची नवी ओळख ही सीताफळासाठी वाढत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात सीताफळांच्या बागा बहरल्या असून, सध्या बाजारपेठेत सीताफळांची आवक वाढली आहे. त्यामुळे ही मार्केट जिल्ह्यासह परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांना आपल्याकडे खेचत असल्याचे चित्र आहे.पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत फळशेतीला अधिक पसंती दिली आहे. शहरात फूल शेती, बागायती तसेच सीताफळ शेतीलाही अधिक पसंती शेतकºयांनी दिली आहे. सध्या सीताफळ बाजारात येत असल्याने पातूरची बाजारपेठ सीताफळांनी बहरली आहे. खाण्यास चविष्ट व आरोग्यासाठी लाभदायक असल्याने सीताफळांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे येथील बाजारपेठेत खामगाव, वाशिम, बुलडाणा, अकोला येथील व्यापारी गर्दी करीत आहे. येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सीताफळांची आवक वाढल्याने बाजारपेठ ही सीताफळासाठी प्रसिद्ध होत असल्याचे दिसत आहेत. दररोज बाजारपेठेमध्ये गर्दी वाढत असून, लाखोंची उलाढाल होत आहे.शहरात सीताफळांची मोठे मार्केट असून, खूप मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. सीताफळ खरेदीसाठी दुरून फळविक्रेत्यांसह ग्राहक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीने भरपूर असलेला पातूर तालुका गोड आंब्यासोबतच गुणकारी गोड सीताफळासाठीसुद्धा ओळखला जाते. त्यामुळे अकोला, वाशिम, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर, खामगावसह परजिल्ह्यातील व्यापारी शहरांमधून सीताफळाच्या खरेदीसाठी येत आहेत.सीताफळ खाण्याचे फायदेसीताफळ हे पित्तशामक, तृषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृदयासाठी फायदेशीर असे आहे. उच्च रक्तदाब तसेच हृदरोगाच्या रुग्यांनी सीताफळ खाणे फायदेशीर ठरते. सीताफळात व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए असल्याने डोळ्यांसाठी अत्यंत गुणकारी आहे. सीताफळांच्या बियांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सीताफळ सेवनाने कॅन्सर आणि डायबेटिससारख्या आजारांवरसुद्धा नियंत्रण मिळविता येते.

 

 

टॅग्स :agricultureशेतीPaturपातूरAkolaअकोला