अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी ‘ऑटोडीसीआर’
By Admin | Updated: July 9, 2014 00:27 IST2014-07-09T00:27:04+5:302014-07-09T00:27:04+5:30
संगणकीय प्रणाली होणार कार्यान्वित

अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी ‘ऑटोडीसीआर’
अकोला : शहरातील अनधिकृत बांधकामांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अत्याधुनिक संगणकीय ह्यऑटोडीसीआरह्ण प्रणाली कार्यान्वित केल्या जाईल. याकरिता महापालिका आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची चाचपणी अंतिम टप्प्यात असून, आगामी दिवसात निविदा प्रक्रिया राबविल्या जाणार आहे.
मनपाच्या नगर रचना विभागातील नकाशा मंजुरीची कामे अनेकदा वादाच्या भोवर्यात सापडतात. त्याचे परिणाम अनधिकृत इमारतींच्या माध्यमातून समोर आले असून, दुकाने, फ्लॅट खरेदी केलेल्या नागरिकांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. बांधकाम व्यवसाय तेजीत आल्याने महापालिकेवर बांधकाम नकाशे मंजुरीचा ताण वाढला. संबंधित आर्किटेर (आरेखक) व अभियंत्याने नकाशा तयार करून तो नगर रचना विभागाक डे सादर करायचा, अन् नियमानुसार मंजूर करून घ्यायचा, अशी जुनी पद्धत सुरू आहे. अचूक, वेगवान व पारदर्शक बांधकाम नकाशा मंजुरीचे ह्यऑटोडीसीआरह्ण मॉडेल राबविण्याचा निर्णय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आहे. ऑटोडीसीआरची ऑनलाईन प्रणाली विकसित केल्यास अनधिकृत बांधकामांना आळा बसणार आहे. अचूक प्रणालीसाठी आवश्यक असणार्या सॉफ्टवेअरची चाचपणी सुरू असून, याकरिता लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
** पुणे मॉडेलची ३६ शहरात अंमलबजावणी
पुणे महापालिकेचे अधिकारी, आर्किटेक्ट व बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येत, ऑटोडीसीआरची ऑनलाईन प्रणाली विकसित केली. त्या ठिकाणच्या ह्यकेड्राईह्ण बांधकाम व्यावसायिक संघटनेने हे सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य केले. पुणे मॉडेलची ३६ शहरात अंमलबजावणी सुरू आहे.
नकाशा होईल ऑनलाईन मंजूर
या प्रणालीअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने बांधकामाचा नकाशा सादर केला जाईल. त्यानुसार अचूक माहिती देण्यासह सत्यता तपासून ऑनलाईन नकाशे मंजूर केले जातील. यामध्ये विकासकाचे नाव टाकल्यास कोणालाही जगभरातून हा नकाशा पाहता येईल.