तब्बल महिनाभरानंतर दुरुस्त झाली ‘सर्वोपचार’ची ‘सीटी स्कॅन’ मशिन!

By Atul.jaiswal | Updated: August 19, 2018 16:56 IST2018-08-19T16:18:45+5:302018-08-19T16:56:41+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील क्ष-किरण विभागातील सीटी स्कॅन मशीन दुरुस्त करण्यात रुग्णालय प्रशासनाला जवळपास महिनाभरानंतर यश आले.

'ct scan' machine repair after a month | तब्बल महिनाभरानंतर दुरुस्त झाली ‘सर्वोपचार’ची ‘सीटी स्कॅन’ मशिन!

तब्बल महिनाभरानंतर दुरुस्त झाली ‘सर्वोपचार’ची ‘सीटी स्कॅन’ मशिन!

ठळक मुद्दे ‘कॅथोड पॉवर मोड्युल’ हा अत्यंत महत्त्वाचा सुटा भाग हॉलंड येथून मागवावा लागला. या सुट्या भागाच्या प्रतीक्षेत सीटी स्कॅन मशीनची दुरुस्ती रखडली होती. शनिवारी मशीन कार्यान्वित झाल्यानंतर नियमितपणे रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या.

अकोला: गत महिनाभरापासून नादुरुस्त असलेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील क्ष-किरण विभागातील सीटी स्कॅन मशीन दुरुस्त करण्यात रुग्णालय प्रशासनाला जवळपास महिनाभरानंतर यश आले असून, शनिवारपासून नियमितपणे या मशिनवर तपासण्या करण्यास सुरुवात झाली आहे.
सर्वोपचार रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन ‘रोटर बॅलन्स किट’, ‘क्सिट’ स्ट्रॅप पॅड असेम्ब्ली, जनरेटर सर्व्हिस टूल्स व कॅथोड पॉवर मोड्युल हे सुटे भाग निकामी झाल्याने गत २० जुलैपासून बंदच होती. या चार सुट्या भागांपैकी ‘कॅथोड पॉवर मोड्युल’ हा अत्यंत महत्त्वाचा सुटा भाग हॉलंड येथून मागवावा लागला. या सुट्या भागाच्या प्रतीक्षेत सीटी स्कॅन मशीनची दुरुस्ती रखडली होती. आता या सुट्या भागाची ‘डिलिव्हरी’ मिळाल्यानंतर शुक्रवारी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येऊन त्याच दिवशी सायंकाळपर्यंत ती दुरुस्त झाली. शनिवारी मशीन कार्यान्वित झाल्यानंतर नियमितपणे रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

हॉलंडहून आलेला सुटा भाग प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी मशिन दुरुस्त करण्यात आली. शनिवारी सीटी स्कॅन मशीन रुग्णसेवेत रुजू होऊन नियमितपणे तपासण्या करण्यात आल्या.

- डॉ. कुसुमाकर घोरपडे, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

Web Title: 'ct scan' machine repair after a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.