लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी, कोरोनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:19 IST2021-04-27T04:19:34+5:302021-04-27T04:19:34+5:30

मागील तीन दिवसांपासून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त सोमवार रोजी प्रकाशित करण्यात आले ...

Crowds of citizens to get vaccinated, corona threat | लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी, कोरोनाचा धोका

लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी, कोरोनाचा धोका

मागील तीन दिवसांपासून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त सोमवार रोजी प्रकाशित करण्यात आले होते. सोमवारी आरोग्य केंद्रात कोविड लस उपलब्ध होताच, लसीकरण करून घेण्यासाठी ज्येष्ठ व ग्रामस्थांची गर्दी झाली. त्यामुळे लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी एकमेकांपासून सामाजिक अंतर ठेवूनच लसीकरण करणे गरजेचे होते, परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. लसीकरण घेण्यासाठी गर्दी होऊ नये, यासाठी वरिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी लक्ष देऊन यावर नियंत्रण ठेवावे. अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे. नागरिकांनी आरोग्य केंद्रात एकाच वेळी एकाच ठिकाणी गर्दी करू नये. नियमांचे पालन करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा मसने यांनी केले आहे.

Web Title: Crowds of citizens to get vaccinated, corona threat