सावरा येथे लसीकरण केंद्रात नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:17 IST2021-05-01T04:17:26+5:302021-05-01T04:17:26+5:30
जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आलेख चढत चालला आहे. तसेच मृत्यूंची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये ...

सावरा येथे लसीकरण केंद्रात नागरिकांची गर्दी
जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आलेख चढत चालला आहे. तसेच मृत्यूंची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ४५ वर्ष वयोगटातील ग्रामस्थांना लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. सावरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ४२ गावे येत असून, रोहनखेड, बांबर्डा, सावरगाव, कवठा बुद्रुक परिसरातील ग्रामस्थ लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येत आहे. येथील लसीकरण केंद्रात नियोजनाचा अभाव असल्याने गर्दी होत आहे तसेच यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असून, शासनाने रुग्णांमध्ये वाढ होऊ नये यासाठी लॉकडाऊन घोषित केले; मात्र नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिक एकाच ठिकाणी गर्दी करतात. (फोटो)
------------------------------
सावरा येथील आरोग्य केंद्रात परिसरातील ज्येष्ठ नागरिक कोविड-१९ लसीकरणासाठी येतात. त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करूनच लसीकरण करावे, याबाबत सांगण्यात येते; मात्र ज्येष्ठ नागरिक सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करतात.
-अंकुश वालशिंगे, वैद्यकीय अधिकारी, सावरा.
--------------------------------------------------------