सट्टा बाजारात करोडोची उलाढाल
By Admin | Updated: May 9, 2014 00:35 IST2014-05-09T00:34:50+5:302014-05-09T00:35:23+5:30
लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा सट्टा बाजार अधिकाधिक तेज होत आहे.

सट्टा बाजारात करोडोची उलाढाल
बुलडाणा : लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा सट्टा बाजार अधिकाधिक तेज होत आहे. आजपर्यंत या बाजारात एक कोटीहून अधिक रकमेची उलाढाल झाल्याची माहिती एका सटोडियाने दिली आहे.
निवडणुकीचा निकाल व सट्टा यांचा जवळचा संबंध असून, निकालावर चालणारा हा जुगार एकप्रकारे निवडणुकीचे भाकितच दर्शवित असते. सट्टा बाजारातील भाकिते अनेकदा खरे झाल्यामुळे सर्वसाधारण लोकांनाही सट्टा बाजारातील आकडेवारीमध्ये रस निर्माण होत आहे. सध्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांचा भाव १८ ते २0 पैसे असून, राष्ट्रवादीचे उमेदवार कृष्णराव इंगळे यांचा भाव १ ते ५ रुपयांपर्यंत असल्याची माहिती आहे. हा भाव सटोडीयेच ठरवितात त्यामुळे निवडूून येण्याची क्षमता व संधी पाहून या भावामध्ये चढ-उतार होत असतो.
या बाबत माहिती घेतली असता अनेकदा उमेदवाराचे कट्टर कार्यकर्तेच आपल्या उमेदवारासाठी भाव पाडून सट्टा लावतात, असेही समोर आले आहे. या बाजाराचा आधारच मुळात ‘हवा’ असल्याने कोण येणार याची हवा तयार करून सट्टा खेळला जातो. लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत १ कोटी रुपयापेक्षा अधिक सट्टा लागला असून, मतमोजणीची वेळ जवळ येत असताना हा बाजार तेज होऊ लागला आहे.