२३ हजार हेक्टरवरील कपाशीची वाढ खुंटली
By Admin | Updated: October 27, 2014 23:30 IST2014-10-27T23:30:12+5:302014-10-27T23:30:12+5:30
पश्चिम व-हाडात कापसाच्या पहिल्या वेचणीतच ३0 टक्के घट.

२३ हजार हेक्टरवरील कपाशीची वाढ खुंटली
ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा)
पावसाने दडी मारल्यामुळे पश्चिम वर्हाडातील २३ हजार २५0 हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिक धोक्यात आले आहे. पांढरं सोनं समजल्या जाणार्या या पिकाची विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे वाढ खुंटली आहे. कापसाच्या पहिल्याच वेचणीत कपाशीच्या उत्पादनात ३0 टक्के घट झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
यावर्षी मान्सूनचे आगमन जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाल्याने इतर पिकांच्या लागवडीचा काळ निघून गेला. कापूस लागवडीची मुदत तेवढी शिल्लक होती. त्यामुळे २0१३-१४ च्या कापूस हंगामाच्या तुलनेत २0१४-१५ च्या हंगामात १0 टक्क्यांनी का पसाची लागवड वाढली. राज्यात सुमारे ४१ लाख हेक्टर क्षेत्रावर, तर विदर्भात सुमारे १७ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणी करण्यात आली. त्यापैकी पश्चिम वर्हाडात सुमारे २३ हजार २५0 हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात् ७ हजार ८५0 हेक्टर, अकोला जिल्ह्यात ८ हजार ६७५ हेक्टर, आणि वाशिम जिल्ह्यात् ६ हजार ७२५ हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरणी करण्यात आलेली आहे. पश्चिम वर्हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम या तिन्ही जिलत पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे २३ हजार २५0 हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाची वाढ खुंटली आहे.
पावसाच्या हुलकावणीबरोबरच कपाशी पिकावर पॅराविल्टसारख्या विविध रोगांचे आक्रमण झाल्यामुळे पिक धोक्यात आले आहे. सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू झाला असून, पश्चिम वर्हाडातील कापूस उत्पादनात ३0 टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी कृषी पंपाच्या साहायाने पिकाला पाणी पुरविण्यासाठी धड पड करीत आहे. अशातच कापसाचे भाव उतरल्याने शेतकर्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.
* कोरडवाहूवरील कपाशीने माना टाकल्या
पावसाअभावी कोरडवाहू शेतीवरील कपाशी पिक धोक्यात आले आहे. सध्या कोरडवाहू शेतीवरील कपाशीने माना टाकल्या असून, त्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. कापसाची पहिली वेचणी सर्वत्र सुरू झाली असून, कोरडवाहूवरील कपाशी मात्र सुकण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.