७0 गुन्हेगार शहरातून तडीपार
By Admin | Updated: July 18, 2015 01:44 IST2015-07-18T01:44:54+5:302015-07-18T01:44:54+5:30
‘एसडीओ’चा आदेश; दोन दिवसांसाठी प्रतिबंधात्मक कारवाई.

७0 गुन्हेगार शहरातून तडीपार
अकोला : रमजान ईदनिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील चार पोलीस ठाणे अंतर्गत ७0 गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी शहरातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शुक्रवारी दिला. रमजान ईद उत्सव शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाच्या प्रस्तावानुसार शहरातील चार पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्हे दाखल असलेल्या ७0 गुन्हेगारांना १८ व १९ जुलै या दोन दिवसांच्या कालावधीसाठी अकोला शहरातून तडीपार करण्यात आले. त्यामध्ये सिव्हिल लाइन पोलीस ठाणे अंतर्गत २६, जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत ५, आकोट फैल पोलीस ठाणे अंतर्गत २२ आणि खदान पोलीस ठाणे अंतर्गत १७ गुन्हेगारांचा समावेश आहे. रमजान ईद उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ७0 गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी शहरातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश ह्यएसडीओह्ण खडसे यांनी दिला.