आकाेटातील गुन्हेगारांची टाेळी दाेन वर्षांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:23 IST2021-09-04T04:23:17+5:302021-09-04T04:23:17+5:30

आकाेट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवनिर्माण चाैकातील रहिवासी लखन उर्फ नीलेश साहेबराव अंभाेरे (वय ३३) व विशाल किशाेर चंदन ...

The criminals in Akata were deported for two years | आकाेटातील गुन्हेगारांची टाेळी दाेन वर्षांसाठी हद्दपार

आकाेटातील गुन्हेगारांची टाेळी दाेन वर्षांसाठी हद्दपार

आकाेट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवनिर्माण चाैकातील रहिवासी लखन उर्फ नीलेश साहेबराव अंभाेरे (वय ३३) व विशाल किशाेर चंदन (वय २७) हे दोघे जण जिल्ह्याच्या विविध भागांत टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून दोन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या दोघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून आकाेट शहर पोलिसांनी या दोन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. आकाेट शहर पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत या दोघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली; मात्र दोन्ही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने या दोन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Web Title: The criminals in Akata were deported for two years