वनविभागातील लाचखोर महिला लेखापाल किरडे जेरबंद

By Admin | Updated: April 30, 2015 01:55 IST2015-04-30T01:55:08+5:302015-04-30T01:55:08+5:30

उपवनसंरक्षक कार्यालयातील प्रकार, धनादेश देण्यासाठी मागितली लाच.

Criminal women accountant Kirida Jerborand in Forest Department | वनविभागातील लाचखोर महिला लेखापाल किरडे जेरबंद

वनविभागातील लाचखोर महिला लेखापाल किरडे जेरबंद

अकोला - धनादेश देण्यासाठी तक्रारकर्त्यास वन विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल वंदना गणेशराव किरडे हिने लाच मागितल्याप्रकरणी तिला वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. या प्रकरणी ितच्याविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सापळा रचून असल्याची माहिती मिळताच, या महिला कर्मचार्‍याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याची माहिती आहे. वाशिम जिल्हय़ातील मालेगाव येथे कार्यरत असलेले वनरक्षक यांनी २0१२ मध्ये गृहकर्जासाठी अर्ज केला होता. या गृहकर्जाच्या अर्जाला २0१५ मध्ये मंजुरी मिळाली असून, त्यांचा ५ लाख २४ हजार ५00 रुपयांचा धनादेशही वन विभागाच्या कार्यालयात तयार होता. वन विभागाच्या अकोलास्थित विभागीय कार्यालयाकडून त्यांना हा धनादेश मिळणार होता. हा धनादेश अर्जदारास देण्यासाठी वन विभागाच्या उपवन संरक्षक कार्यालयातील लेखापाल वंदना गणेशराव किरडे हिने दोन हजार रुपयांची लाच मागितली. यामधील एक हजार रुपये या महिला लेखापालने २६ मार्च रोजी घेतलेही, त्यानंतर उर्वरित एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी महिला लेखापाल वंदना किरडे हिने अर्जदारास सुरू केली. त्यानंतर अर्जदाराने या प्रकरणाची तक्रार वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख विलास पाटील यांच्याकडे केली. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन साक्षीदारांसमोर लाचेची रक्कम मागण्यासंदर्भात तपासणी केली. यामध्ये सदर महिला लेखापाल अर्जदारास एक हजार रुपयांची लाच मागत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख विलास पाटील यांच्या पथकाने सापळा रचून लेखापाल वंदना किरडे हिला अटक केली. तिच्याविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Criminal women accountant Kirida Jerborand in Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.