विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

By Admin | Updated: February 22, 2017 02:40 IST2017-02-22T02:40:20+5:302017-02-22T02:40:20+5:30

वाडेगाव येथील घटना

Criminal offense for motivation to commit suicide | विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

बाळापूर (अकोला), दि. २१-: वाडेगाव येथील विवाहितेने गळफास घेऊन २0 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृतक विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या तिघांविरुद्ध बाळापूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बाश्रीटाकळी तालुक्यातील पैसाडी सुपाडी येथील माहेर असलेल्या अश्‍विनी सुरवाडे यांचा विवाह १६ फेब्रुवारी २0१६ रोजी वाडेगाव येथील अजय प्रकाश हिवराळे यांच्याबरोबर झाला होता. गेल्या काही दिवसांपासून माहेरवरून ५0 हजार रुपये आण्यासाठी पती व सासू नेहमीच मारहाण करायचे, असा आरोप अश्‍विनी सुरवाडे यांचा भाऊ आतीष सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत केला आहे. २0 फेब्रुवारी रोजी सकाळी मुलीचा माहेरी फोन आल्याने वडिलानी आतीष सुरवाडे याला व त्याच्या मावस भावाला वाडेगाव येथे पाठविले. तेथे दोघा भावांनी सासरच्या मंडळींना समजावून सांगून दुपारी गावाकडे परतले. ते गेल्यानंतर पती, सासू व सासरे यांनी अश्‍विनीबरोबर पुन्हा वाद घालून मारहाण केली. त्यामुळे हा छळ सहन न झाल्याने अश्‍विनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सुरवाडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती अजय प्रकाश हिवराळे, सासू सुनीता प्रकाश हिवराळे, सासरा प्रकाश रामकृष्ण हिवराळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Criminal offense for motivation to commit suicide