विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हे

By Admin | Updated: October 10, 2016 03:11 IST2016-10-10T03:11:56+5:302016-10-10T03:11:56+5:30

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Crimes against mother-in-law for suicide | विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हे

विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हे

कुरूम (जि. अकोला), दि. 0९- ब्रम्ही खुर्द येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पती व सासरे यांना अटक करण्यात आली आहे. ब्रम्ही खुर्द येथील अश्‍विनी मंगेश इंगळे या विवाहितेने घरातील पंख्याला गळफास लावून ८ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी राहुल वानखडे यांनी माना पोलिसांत फिर्याद देऊन अश्‍विनीचा सासरकडील मंडळी हुंड्यासाठी छळ केल्याचे तक्रारीत म्हटले. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप राहुल वानखडे यांनी फिर्यादीत केला आहे. याप्रकरणी माना पोलिसांनी अश्‍विनी यांचे पती मंगेश इंगळे, सासरे अंबादास इंगळे व सासू प्रभाबाई इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crimes against mother-in-law for suicide