मुलीला पळवून नेणार्‍या युवकाविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: July 2, 2014 00:32 IST2014-07-02T00:18:56+5:302014-07-02T00:32:17+5:30

मुलीस पळवून नेल्याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी मंगळवारी दुपारी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Crime against a young girl who is abducting a girl | मुलीला पळवून नेणार्‍या युवकाविरुद्ध गुन्हा

मुलीला पळवून नेणार्‍या युवकाविरुद्ध गुन्हा

अकोला: चिखलपुरा भागातील १५ वर्षीय मुलीस पळवून नेल्याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी मंगळवारी दुपारी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुलीस पळवून नेण्यासाठी युवकास मदत करणार्‍या महिलेस पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिला ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार २८ जून रोजी मुलगी चिखलपुर्‍यात राहणारी रेश्मा अशोक रावेकर (२८) हिच्या घरी जात असल्याचे सांगून गेली; परंतु रात्री उशिरापर्यंत मुलगी परत न आल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी रेश्माकडे विचारणा केली असता, तिने मुलगी नीलेश मोरे नामक युवकासोबत पळून गेल्याचे सांगितले. मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये रेश्मा हिनेच मुलीला पळवून नेण्यासाठी युवकाला मदत केल्याचा आरोप केला. पोलिसांनी मंगळवारी रेश्मा रावेकर हिला अटक करून तिची चौकशी सुरू केली. तिला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Crime against a young girl who is abducting a girl