शिवसंग्रामचे उमेदवार संदीप पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: October 10, 2014 01:14 IST2014-10-10T01:14:06+5:302014-10-10T01:14:06+5:30

भाजप नेत्यांची छायाचित्रे लावणे भोवले.

The crime against Shiv Sena candidate Sandeep Patil | शिवसंग्रामचे उमेदवार संदीप पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा

शिवसंग्रामचे उमेदवार संदीप पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा

अकोला: बाळापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार तेजराव थोरात हे असतानाही आपल्या प्रचाराची फलके व जाहिरातींवर भाजपच्या नेत्यांची छायाचित्रे लावून भाजपचा आपल्याला पाठिंबा असल्याचे दर्शविणे याच मतदारसंघातील शिवसंग्राम पक्षाचे उमेदवार संदीप पाटील यांना महागात पडले आहे. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भाजपचे लक्ष्मणराव उमाळे, तेजराव थोरात यांनी केलेल्या तक्रारीवरून बाळापूरचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राम लठाड यांनी याप्रकरणी संदीप पाटील यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्याचे आदेश दिले. बाळापूर पोलिसांनी बाळापूर न्यायालयाच्या परवानगीने संदीप पाटील यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १७१ जी व १७१ एफ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील कार्यवाही ठाणेदार घनश्याम पाटील करीत आहेत.

Web Title: The crime against Shiv Sena candidate Sandeep Patil