गृहराज्यमंत्र्यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: July 7, 2017 01:29 IST2017-07-07T01:29:09+5:302017-07-07T01:29:09+5:30

मूर्तिजापूर : गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडील माजी आमदार व्ही.एन. पाटील यांच्याविरुद्ध मूर्तिजाूपर ग्रामीण पोलिसांनी चार दिवसांच्या तपासानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Crime against the father of the minister | गृहराज्यमंत्र्यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा

गृहराज्यमंत्र्यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : तालुक्यातील घुंगशी येथील एका विद्यालयातील कर्मचाऱ्याबरोबर वाद घातल्याप्रकरणी अकोल्याचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडील माजी आमदार व्ही.एन. पाटील यांच्याविरुद्ध मूर्तिजाूपर ग्रामीण पोलिसांनी चार दिवसांच्या तपासानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील घुंगशी येथील भाऊसाहेब देशमुख विद्यालयात व्ही.एन. पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यासह भेट दिली होती. त्यावेळी तेथील एका कर्मचाऱ्याबरोबर त्यांचा वाद झाला होता. शिपाई अमोल काळे याने पाटील यांनी आपल्याला थापड मारल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवर मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी चार दिवस तपास करून व्ही.एन. पाटील यांच्याविरुद्ध कलम ३२३,५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Web Title: Crime against the father of the minister