विवाहितेचा छळ करणा-या आठ जणांविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: June 25, 2016 02:09 IST2016-06-25T02:09:25+5:302016-06-25T02:09:25+5:30

वाशिम जिल्हय़ातील कारंजा येथे सासर असलेल्या विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल.

Crime against eight people who are harassing Married | विवाहितेचा छळ करणा-या आठ जणांविरुद्ध गुन्हा

विवाहितेचा छळ करणा-या आठ जणांविरुद्ध गुन्हा

अकोला: वाशिम जिल्हय़ातील कारंजा येथे सासर असलेल्या एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या आठ जणांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठय़ा उमरीतील गायत्री नगर येथील रहिवासी स्वाती डांगे हिचा विवाह कारंजा येथील रहिवासी चंद्रशेखर सुभाष डांगे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर चंद्रशेखर डांगे याच्या कुटुंबीयांनी स्वातीला माहेरवरून १0 लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला; मात्र स्वातीने पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर चंद्रशेखर डांगे यांच्या कुटुंबीयांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. छळ असहय़ झाल्यानंतर महिलेने सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चंद्रशेखर डांगे यांच्यासह आठ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against eight people who are harassing Married