गोवंश हत्याबंदी कायद्याने सोयाबीनला ‘अच्छे दिन’!

By Admin | Updated: April 8, 2015 01:44 IST2015-04-08T01:44:12+5:302015-04-08T01:44:12+5:30

डीओसीची मागणी वाढल्याने दरवाढ

Cow slaughter law soya bean 'good day'! | गोवंश हत्याबंदी कायद्याने सोयाबीनला ‘अच्छे दिन’!

गोवंश हत्याबंदी कायद्याने सोयाबीनला ‘अच्छे दिन’!

अकोला - राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्यात आल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. या कायद्याने गोवंशाची हत्या बंद झाल्याने कोंबडीच्या मांसाची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोंबड्यांचे खाद्य असलेल्या सोयाबीन ढेपेची (डीओसी) मागणी वाढली असून, त्याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आहे. मागील आठवड्यात क्विंटलमागे तब्बल ३00 ते ३३0 रुपये दरवाढ झाली असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामात सोयाबीन निघाल्यापासून शेतकर्‍यांना त्यांच्याकडील सोयाबीनला क्विंटलमागे २७00 ते ३२00 रुपयांच्या पुढे दर मिळाले नाहीत. हंगाम संपल्यानंतरही दर वाढण्याची चिन्हे नव्हती. अलिकडे कोंबडीचे खाद्य असलेल्या डीओसी अर्थात सोयोबीनच्या ढेपेची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. अकोला जिलतील पाच व राज्या तील एकूण ४६ मोठय़ा सोयाबीन तेल उत्पादक कंपन्यांकडून सोयाबीनच्या मागणीत वाढ झाली आहे. हंगामात सोयाबीनला २७00 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. हंगाम संपल्यानंतर हे दर ३२00 रुपयांपर्यंत पोहोचले. आता मात्र सोयाबीनची मागणी वाढताच क्विंटलमागे सोयाबीनचे दर ३५३0 रुपये झाले आहेत. गोवंश हत्याबंदीच्या प्रभावाने का होईना, पण शेतकर्‍यांकडील सोयाबीनला बाजारपेठेत ह्यअच्छे दिनह्ण आले आहेत. यासंदर्भात अकोल्यातील व्यावसायिक वसंत बाच्छुका यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोयाबीन दरात अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. ही दरवाढ डीओसीच्या मागणीत झालेल्या दरवाढीचा परिणाम आहे. गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यानंतर डीओसीची मागणी वाढल्याचा हा परिणाम असल्याचे नमूद केले. शेतकर्‍यांपेक्षा व्यापा-यांनाच लाभ सोयाबीनच्या दरात अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. शेतकर्‍यांकडील सोयाबीन आता जवळपास संपले असून, व्या पार्‍यांनी त्याची मोठय़ा प्रमाणावर खरेदी करून साठवणूक केली आहे. आता वाढलेल्या दराचा लाभ शेतकर्‍यांऐवजी सोयाबीन साठवून ठेवणार्‍या या व्यापार्‍यांनाच होणार आहे.

Web Title: Cow slaughter law soya bean 'good day'!