खासगी रुग्णालयातून आजपासून कोविड लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:33 IST2021-03-04T04:33:10+5:302021-03-04T04:33:10+5:30

जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातून लसीकरण आज (दि. ३) पासून करण्यात येणार आहे. यात संत तुकाराम हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, माऊली मॅटर्निटी ...

Covid vaccination from a private hospital from today | खासगी रुग्णालयातून आजपासून कोविड लसीकरण

खासगी रुग्णालयातून आजपासून कोविड लसीकरण

जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातून लसीकरण आज (दि. ३) पासून करण्यात येणार आहे. यात संत तुकाराम हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल, माऊली मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल, डॉ. के. एस. पाटील हॉस्पिटल ॲन्ड पॉलिक्लिनिक हॉस्पिटल, श्रीमती बी. एल. चांडक रिसर्ज फाऊंडेशन (वसंती हॉस्पिटल) आणि शुक्ला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कोविन ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनस्पॉट नोंदणीसुद्धा करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांनी लसीकरणाच्या जागी सामाजिक अंतर, मास्क वापर व सॅनिटाईज करणे या त्रिसूत्रीय नियमाचे पालन करावे. येणाऱ्या व्यक्तीसाठी केंद्रावर ऑक्सिजन सिलिंडर व उपचारासाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करावी. प्रत्येक व्यक्तीला लसीकरण झाल्यानंतर अर्ध्या तास निरीक्षणाखाली ठेवावे. लसीकरण झालेल्या व्यक्तींना २५ तासाच्या आत ताप येणे, डोके दुखणे व हात जड होणे यासारखे लक्षणे दिसण्याची शक्यता असते. याबद्दलची माहिती देण्यात यावी. खासगी लसीकरण केंद्रांनी लसीचा गैरवापर होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

आज ६०४ व्यक्तींना लसीकरण

आज जिल्ह्यातील शासकीय लसीकरण केंद्रावर ६०४ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यात ६० वर्षांवरील ४०९ वयोवृद्धाचा, तर ४५ ते ५९ वयातील दुर्धर आजार असणाऱ्या ३४ व्यक्तींचा आणि १६१ इतर व्यक्तीचा समावेश आहे.

Web Title: Covid vaccination from a private hospital from today