पातूर तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST2021-02-23T04:29:25+5:302021-02-23T04:29:25+5:30
पातूर : काेराेना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पातूर तालुक्यासाठी सोमवारपासून डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयात कोविड केअर सेंटर ...

पातूर तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू
पातूर : काेराेना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पातूर तालुक्यासाठी सोमवारपासून डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.
गत काही दिवसांपासून पातूर तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या ग्रामीण भागासह शहरात १९ जण काेराेनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आगामी काळात रुग्णांची संख्या वाढल्यास त्यासाठी डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयात ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
याबाबत तहसीलदार दीपक बाजड, पातूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव, निवासी नायब तहसीलदार विजय खेडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य व मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी सोमवारी आढावा घेतला. पातूर शहर, शिर्ला ग्रामपंचायत हद्दीत तहसीलदारांच्या नेतृत्वात महसूल विभाग, नगर परिषद पंचायत समिती पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथक तयार केले. या विभागाच्या समन्वयातून मास्क न वापरणाऱ्या १५ नागरिकांविरुद्ध प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे ३ हजार रुपये दंड आकारण्यात आला. आतापर्यंत १२८ नागरिकांविराेधात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नगर परिषद मराठी मुलांची शाळा क्रमांक १ या ठिकाणी ७७ आणि ग्राम कोठारी येथे ५३ असे एकूण १३० व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी ग्रामपंचायत देऊळगाव व येथील नगर परिषदेची मराठी मुलांची शाळा क्रमांक १ या दोन्ही ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. शहरातील सर्व व्यावसायिक तथा कोरोना लक्षण असणाऱ्या नागरिकांना ही चाचणी बंधनकारक आहे. त्यामुळे पातूर तालुक्यातील व्यावसायिकांनी कोरोना चाचणी येत्या पाच दिवसात करणे अनिवार्य असल्याचे तहसीलदारांनी म्हटले आहे.