तेल्हारा खरेदी विक्री संस्थेच्या संचालकांना न्यायालयाचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:19 IST2021-03-05T04:19:28+5:302021-03-05T04:19:28+5:30
पुंडलिक देवलाल अरबट रा. अडसूळ यांच्या तक्रारीनुसार तेल्हारा खरेदी विक्री संस्थेच्या संचालकांपैकी अकरा जणांनी संगनमत करून खरेदी विक्री संघाच्या ...

तेल्हारा खरेदी विक्री संस्थेच्या संचालकांना न्यायालयाचा दिलासा
पुंडलिक देवलाल अरबट रा. अडसूळ यांच्या तक्रारीनुसार तेल्हारा खरेदी विक्री संस्थेच्या संचालकांपैकी अकरा जणांनी संगनमत करून खरेदी विक्री संघाच्या प्रस्तावित शॉपिंग कॉम्प्लेक्स प्रस्तावित भाडे धारकांकडून प्रत्येकी २६ हजार रुपये असे एकूण २ लाख ७५ हजार रूपये घेऊन आपसात वाटून घेतले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तेल्हारा यांनी कलम १५६ (३) सीआरपीसी प्रमाणे तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने तेल्हारा पोलिसांनी फेब्रुवारी रोजी रात्री अकरा जणांविरूद्ध भादंवि कलम ४२०, ४६८, ४०८, ४७१ सहकलम १२० ब नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यावर खरेदी विक्री संस्थेच्या संचालकानी अकोट येथील जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली. संचालक सुरेश साहेबराव ढोले घोडेगाव, सुरेशचंद्र देवराव काळे उकळी, किसनराव साहेबराव बोडखे, वसंतराव साहेबराव बोडखे निंभोरा, पुंडलिकराव कौतिकराव खारोडे तेल्हारा, प्रकाश हरिभाऊ आढे दापुरा, भुजंगराव बाबाराव दुतोंडे वरुड, सुदेश सिताराम शेळके चांगलवाडी, अनिल मोतीराम कराळे हिवरखेड, श्रीराम भिकुजी कुकडे राणेगाव व अनिल नादरे साहाय्यक निबंधक सहकारी संस्था तेल्हारा यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तसेच पुंडलिक अरबट यांनी खरेदी विक्री मधून ६८ हजार ७४१ रुपयांची बनावट बिले काढल्याप्रकरणी न्यायालयात दुसरा अर्ज केला. न्यायालयाने सदर प्रकरणात १६ आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हाेते. सदर प्रकरणात खरेदी विक्री संचालकांच्यावतीने ॲड.विलास जवंजाळ तेल्हारा व ॲड. सत्यनारायण जोशी यांनी बाजू मांडली.