वाशिम : न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत देण्यासाठी मुख्य न्यायदंडाधिकार्यांच्या वरिष्ठ लिपिकास चारशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी दुपारी जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमधील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या सहायक अधीक्षकांच्या कक्षात ही घटना घडली. या प्रकरणातील तक्रारदारावर २00१ साली जुगाराची कारवाई झाली होती. या प्रकरणाच्या निकालाची प्रत तक्रारदारास चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी पाहिजे होती. त्यासाठी त्याने रितसर अर्ज केला होता. त्यानंतर वरिष्ठ लिपिक साहेबराव किसनराव हांडे यांच्याकडे विचारणा केली असता, त्याने फाईल शोधायला वेळ लागेल, असे सांगून दुसर्या दिवशी बोलावले. तक्रारदार दुसर्या दिवशी हांडे यांच्याकडे गेला असता, त्याने ५00 रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने यासंदर्भात एसीबीकडे तक्रार केली असता, सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
न्यायालयाचा लिपिक ‘एसीबी’च्या जाळ्यात
By admin | Updated: September 18, 2014 02:10 IST