शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मिळकत पत्रिकांच्या बनावटगिरीला लागणार चाप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 10:36 IST

भूमिअभिलेख विभागातून बनावट मिळकत पत्रिका, मालकी हक्कांच्या नोंदी होऊ नये, यासाठी चाप लावणारी कार्यपद्धती सुरू केली जात आहे.

अकोला : शहरातील भूखंड, मालमत्तांची बनावट मिळकत पत्रिका तयार करून त्याद्वारे मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात घडला. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणल्यानंतर विधिमंडळात उपस्थित प्रश्नाचा शासनाने गांभिर्याने विचार करत गठित केलेल्या एस.चोक्कलिंगम समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला आहे. त्यानुसार आता भूमिअभिलेख विभागातून बनावट मिळकत पत्रिका, मालकी हक्कांच्या नोंदी होऊ नये, यासाठी चाप लावणारी कार्यपद्धती सुरू केली जात आहे. त्यासाठीचा शासन आदेश ११ जून रोजी महसूल व वन विभागाने प्रसिद्ध केला आहे.अकोल्यातील संतोषी माता मंदिर परिसरातील शासन मालकीचा ४० हजार चौ. फुटाचा भूखंड बनावट दस्तऐवजाद्वारे हडपण्याचा प्रकार आॅगस्ट २०१७ मध्ये उघडकीस आला होता. लोकमतने सातत्याने या बनवेगिरीचा पाठपुरावा केला. त्याचे पडसाद थेट विधिमंडळातही उमटले. त्यावर्षीच्या विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला. तत्कालिन महसूल मंत्र्यांनी सभागृहात माहिती देताना ही बाब अत्यंत गंभिर असून, त्यावर उपाययोजना करणे शासनाला भाग आहे, असे निदर्र्शनास आणून दिले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तत्कालिन जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांची समिती गठित केल्याची घोषणाही करण्यात आली. त्या समितीने याप्रकरणी चौकशी करून भविष्यात हे प्रकार घडू नये, यासाठी अहवाल तयार केला. तो अहवाल शासनाने स्वीकारला. त्यानुसार भूमिअभिलेख विभागाच्या कामकाजात बदल करण्यासाठी आदेशही दिला. त्या आदेशाने आता शहरातील भूखंड, मालमत्तांची बनावट पद्धतीने नोंदणी करून हडपणे, व्यवहार करण्याला चाप लावता येणार आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी भूमिअभिलेख विभागाला करावी लागणार आहे, तसेच या विभागाच्या कामकाजात पारदर्शकताही येणार आहे.

भूमिअभिलेखच्या कार्यपद्धतीत असा होईल बदलभूमिअभिलेख विभागाच्या संगणकीय प्रणालीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना मर्यादित क्षेत्रापुरताच प्रवेश देणे. त्याच्या कार्यक्षेत्राचा वापर इतर व्यक्तीला करता येणार नाही.४ संगणक प्रणालीत युझर नेम व पासवर्डच्या माध्यमातून डेटामध्ये बदल करता येतो. ते टाळण्यासाठी बायोमेट्रिकचा वापर केला जाणार आहे.संगणकातील माहितीला कायदेशिर व अधिकृतता येण्यासाठी डिजिटल स्वाक्षरीचा वापर केला जाणार आहे. डिजिटल स्वाक्षरीच्या डेटात बदल केल्यास ती स्वाक्षरी निघून जाईल. मूळ माहिती एडीट मॉड्यूलमध्ये असेल तर ते बंद करून त्यानंतर फेरफार मॉड्यूलचा वापर अनिवार्य केला जाईल.संगणकावर मिळकत पत्रिका नागरिकांना पाहण्यासाठी खुल्या ठेवल्या जातील. त्यामध्ये बदल झाल्यास नागरिकांच्या लक्षात येईल. सध्याचा डाटा क्लायंट व सर्व्हर या स्थानिक स्तरावर आहेत. त्यामध्ये बदल करणे शक्य आहे. मध्यवर्ती संगणकात हा डाटा ठेवल्यास सुरक्षित राहणार आहे. संगणकात विशिष्ट बाबी कोणी कधी भरल्या, त्यात कधी बदल झाला, या बाबी पाहण्यासाठी तपासणी सूत्र विकसित केले जाईल. त्यामुळे भविष्यात असे प्रकार कोणी केल्यास त्याचे नाव उघड होणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार