शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सीसीआयने कापूस खरेदी सुरू करताच कोसळले सरकी, ढेपचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:48 IST

४,३०० रुपये क्विंटल दराने विकल्या जाणारी सरकी ढेप आता १,६०० रुपये क्विंटलवर येऊन ठेपली आहे.

- संजय खांडेकर

 अकोला : कापूस कार्पोरेशन आॅफ इंडियाने कापसाची विक्रमी सुरू करताच सरकी ढेपीचे भाव कमालीचे कोसळले आहे. अचानक भाव कोसळ््याने पशुपालकांना दिलासा मिळाला असला तरी साठेबाजी करणाऱ्या अनेक व्यापारी-उद्योजकांना कोट्यवधीचा फटका बसला आहे. मागील काही महिन्यांआधी ४,३०० रुपये क्विंटल दराने विकल्या जाणारी सरकी ढेप आता १,६०० रुपये क्विंटलवर येऊन ठेपली आहे.सीसीआय आणि कापूस पणन महासंघाने यंदा १५० लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असून, अजूनही खरेदी सुरूच आहे. खासगी यंत्रणेकडे यंदा कापूस आणि त्यावर प्रक्रिया होत असलेली सरकी नसल्याने सटोडियांनी सरकी ढेपीचे भाव पाडल्याचे बोलले जाते. सरकी ढेप मोठ्या प्रमाणात खाली उतरल्याने अनेकांना कोट्यवधीचा आर्थिक फटका बसला आहे. अकोला जिल्हा परिसरात कापसाचा पेरा जास्त असल्याने शहराच्या एमआयडीसीत आणि जिल्ह्यात जवळपास २०० सरकी ढेपीचे उद्योग आहेत. कापूस आणि त्यापासून निघणाºया सरकीवर प्रक्रिया करणाºया उद्योगांची संख्या जास्त आहे. दुधाळ जनावरांसाठी सरकी ढेप परिणामकारक ठरत असल्यामुळे अकोल्यातील सरकी ढेपीला देशभरात मोठी मागणी आहे. सरकी ढेपीचे भावदेखील अकोल्यातूनच उघडतात. १,५०० ते २,००० रुपये क्विंटलपर्यंत चढ-उतार होणारे सरकी ढेपीचे भाव गत काही महिन्यांपासून थेट ४,३०० रुपयांपर्यंत पोहोचले. सरकी ढेपीत आलेल्या कृत्रिम तेजीमुळे पशुपालक अडचणीत आले होते. त्याचा परिणाम दूध उत्पादकांवर आणि दूध कंपनीवरदेखील झाला. दुधाचे भाव लीटरमागे ६ रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. आता सरकी ढेपीचे भाव उतरले तर दुधाचे दर कमी व्हायला हवे. यावर दूध उत्पादकांनी चुप्पी साधली आहे. 

 एनसीडीईएक्स, साठेबाज  आणि बँका अडचणीत सरकी ढेपीच्या चढ-उताराच्या दरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. म्हणून एनसीडीईक्स आणि इतर खासगी व्यापारी सरकी ढेपीची साठेबाजी करीत असतात. सरकी ढेपीला भाव मिळत असल्याने अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून साठा गोडावूनमध्ये ठेवलेला आहे. त्यावर अनेक बँकांचे तारण कर्जदेखील काढले आहे. आता सरकी ढेपीचे भाव कोसळल्याने साठेबाजी करणारे आणि त्यांना कर्ज देणाºया बँका अडचणीत सापडल्या आहे. यामध्ये अकोल्यातील दोन बँकांचा समावेश आहे.

 सटोडियांनी पाडले सरकी ढेपीचे भावसीसीआयने यंदा १०० लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी केली. सोबतच पणन महासंघानेदेखील राज्यात ५० लाख क्विंटल कापूस खरेदी केला. म्हणजेच यंदा १५० लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी करण्यात आली. शासनाकडूनच यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी झाली अन् कास्तकारालादेखील त्याचा चांगला मोबदला मिळाला. त्यामुळे व्यापारी-उद्योजक आणि खासगी व्यवस्थेच्या हाती यंदा कापूस पाहिजे त्या तुलनेत लागला नाही. पाच क्विंटल कापसात केवळ एक क्विंटल सरकी निघते. आजघडील शासनाकडे असलेल्या १५० लाख कापसातून जवळपास ३० लाख क्विंटल सरकी निघणार आहे. सध्या सरकीदेखील शासनाच्याच ताब्यात असल्याने उद्योजकांनी सरकी ढेपीचे भाव पाडले आहे. सटोडियांनी कृत्रिम पद्धतीने सरकी ढेपीचे भाव वाढवून दिले होते. कापूस आणि सरकी हातून गेल्याने सटोडियांनी सरकी ढेपीचे भाव पाडले, हे आता उघड होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार