कपाशीही करपली; दुष्काळाची छाया गडद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 01:37 PM2018-10-21T13:37:29+5:302018-10-21T13:37:44+5:30

अकोला: पावसातील खंड, भूजल पातळी, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी होणार असतानाच, जिल्ह्यातील विविध भागात कपाशीची पाने लाल झाली असून, पात्या-फुले गळत आहेत.

cotton crop dry; Dark shadow of drought! | कपाशीही करपली; दुष्काळाची छाया गडद!

कपाशीही करपली; दुष्काळाची छाया गडद!

Next

- संतोष येलकर

अकोला: पावसातील खंड, भूजल पातळी, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी होणार असतानाच, जिल्ह्यातील विविध भागात कपाशीची पाने लाल झाली असून, पात्या-फुले गळत आहेत. हाताशी आलेले कपाशीचे पीक करपले असून, कपाशीच्या उत्पादनातही घट होणार असल्याने, कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणारी दुष्काळसदृश परिस्थितीची छाया गडद होत आहे.
पावसातील खंड, भूजल पातळी आणि जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी होणार असल्याची बाब विचारात घेता, जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी अकोट व पातूर हे दोन तालुके वगळता, अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल प्राप्त झाला आहे. मूग, उडिदाचे पीक हातून गेले, सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट होणार असतानाच, रामगाव, मुजरे मोहंमदपूर, गोंदापूर, एकलारा, कासली बु., कासली खुर्द, आपातापा, घुसर, घुसरवाडी यासह जिल्ह्यातील विविध भागात कपाशीचे करपले आहे. कपाशीची पाने लाल झाली असून, पात्या-फुले गळत आहेत. त्यामुळे कपाशी पिकाच्या उत्पादनातही घट होणार असल्याने, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट गडद झाल्याचे चित्र आहे.

फवारणीचाही उपयोग नाही; शेतकºयांचा खर्च पाण्यात!
करपलेल्या कपाशीची लाल झालेली पाने आणि फुले गळून पडत असल्याने, कपाशी पिकाला वाचविण्यासाठी शेतकºयांनी वारंवार कीटकनाशकाच्या केलेल्या फवारणीचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे फवारणीसाठी कापूस उत्पादक शेतकºयांनी केलेला खर्चही पाण्यात जाणार आहे.
 

कपाशीचे पीक करपले असून, लाल झालेली पाने आणि फुले गळून पडत आहेत. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. अशा परिस्थितीत कपाशीची लागवड आणि फवारणीसाठी केलेला खर्चही वसूल होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- शिवाजीराव भरणे, कापूस उत्पादक शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

Web Title: cotton crop dry; Dark shadow of drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.