महापालिकेच्या कर वसुलीला नगरसेवकांची आडकाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST2021-05-15T04:17:58+5:302021-05-15T04:17:58+5:30
आमची मते खराब करू नका! आगामी सात महिन्यांवर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येऊन ठेपली आहे. अशा वेळी प्रभागात मालमत्ता कराची ...

महापालिकेच्या कर वसुलीला नगरसेवकांची आडकाठी
आमची मते खराब करू नका!
आगामी सात महिन्यांवर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येऊन ठेपली आहे. अशा वेळी प्रभागात मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी जाणाऱ्या वसुली निरीक्षकांना थेट नगरसेवकांकडूनच कर वसूल न करण्याची सूचना केली जात असल्याची माहिती आहे. निवडणूक ताेंडावर आली असताना आमची मते खराब करू नका, असे सांगत वसुली प्रक्रियेत आडकाठी घातली जात आहे.
आयुक्तांकडे काेणता आराखडा?
शहरातील अनेक बडे उद्याेजक, राजकीय नेते, व्यापारी, डाॅक्टर, शिक्षण संस्था चालकांकडे काेट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. मनपाने सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे उंबरठे झिजविल्यापेक्षा अशा बड्या आसामींकडून कर वसूल करणे सहज शक्य हाेईल़, या संदर्भात महापालिका आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे नेमका काेणता आराखडा तयार आहे, याबद्दल अकाेलेकरांमध्ये उत्सुकता आहे.