नगरसेविकेची अधिका-याला शिवीगाळ

By Admin | Updated: September 22, 2015 01:37 IST2015-09-22T01:37:11+5:302015-09-22T01:37:11+5:30

महापालिका अधिका-याची पोलीसात तक्रार.

Corporal Officer's Officer | नगरसेविकेची अधिका-याला शिवीगाळ

नगरसेविकेची अधिका-याला शिवीगाळ

अकोला: महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याला शिवीगाळ केल्याप्रकरणी सोमवारी रात्री संबंधित नगरसेविकेच्या विरोधात अधिकार्‍याने खदान पोलिसात तक्रार नोंदविली. सत्तापक्षातील एका नगरसेविकेने सोमवारी सकाळी वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत वाद घातला. तीन वेळा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधल्यावरही फोन उचलत नसल्याचे कारण समोर करून अधिकार्‍याला शिवीगाळ करण्यात आली. हा प्रकार संबंधित अधिकार्‍याने आयुक्त अजय लहाने यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस तक्रार करण्याचे निर्देश दिले.

Web Title: Corporal Officer's Officer