किरकोळ वादातून नगरसेवकास मारहाण

By Admin | Updated: September 4, 2015 01:10 IST2015-09-04T01:10:35+5:302015-09-04T01:10:35+5:30

नालीची सफाई करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात काँग्रेसचे नगरसेवक व त्यांच्या पुत्राला मारहाण.

Corporal assault on retailers | किरकोळ वादातून नगरसेवकास मारहाण

किरकोळ वादातून नगरसेवकास मारहाण

अकोला: नालीची सफाई करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात काँग्रेसचे नगरसेवक व त्यांच्या पुत्राला मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी आकोट फैल परिसरात घडली. या प्रकरणी आकोट फैल पोलीस ठाण्यात मात्र तक्रार करण्यात आली नाही. आकोट फैल परिसरातील प्रभाग क्रमांक २ अ मधील पूरपीडित कॉलनीतील नालीमधील पाण्याचा निचरा होत नसल्याच्या कारणावरून काही जणांनी नगरसेवक काँग्रेसचे आनंदराव सपकाळ व त्यांचा मुलगा विजय सपकाळ यांच्यासोबत वाद घातला. अश्लील शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की करून मारहाण केली. नंतर काही नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. यावेळी मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी घटनास्थळावर जाऊन नालीची पाहणी केली आणि तातडीने नाली दुरुस्ती करण्याचा आदेश दिला. या प्रकरणी नगरसेवक सपकाळ यांनी मारहाण करणार्‍यांविरुद्ध तक्रार दिली नाही.

Web Title: Corporal assault on retailers