शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

CoronVirus : कोरोनाचा आणखी एक बळी; ९ पॉझिटिव्ह, मृतकांचा आकडा २४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:02 IST

शनिवारी रात्री एका ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतकांचा आकडाही २४ झाला आहे.

ठळक मुद्देरविवारी यामध्ये आणखी नऊ जणांची भर पडत एकूण आकडा ३८७ झाला आहे.एका ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल रात्री दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अकोला : कोरोनाचा कहर सुरुच असून, पॉझिटिव्ह रुग्णांसोबतच मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, २४ मे रोजी नऊ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३८७ वर गेला आहे. दरम्यान, शनिवारी रात्री एका ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतकांचा आकडाही २४ झाला आहे. आतापर्यंत कोरोनापासून मुक्त असलेल्या तेल्हारा तालुक्यातही पाच रुग्ण सापडल्याने संपूर्ण जिल्हाचा कोरोनाच्या कक्षेत आला आहे.विदर्भात नागपूरनंतर अकोला शहर कोरोनाचा हॉटस्पाट ठरला आहे. मे महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, शनिवारपर्यत ३७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह होते. रविवारी यामध्ये आणखी नऊ जणांची भर पडत एकूण आकडा ३८७ झाला आहे. रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून १६९ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १६० अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ९ जणांमध्ये चार महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. यापैकी पाच जण हे तेल्हारा शहर व तालुक्यातील आहेत. तर उर्वरित चौघे हे अकोला शहरातील राऊतवाडी, राजीव गांधी नगर, साईनगर डाबकी रोड, श्रावगी प्लॉट या भागातील आहेत. शनिवारी रात्री माळीपूरा भागातील एका ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेला २० मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या मृत्यूमुळे कोरोनाच्या बळींची संख्या २४ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत १३४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.आणखी दहा जणांना डिस्चार्जकाल रात्री दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये सर्व पुरुष आहेत. या सगळ्यांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात दोघे फिरदौस कॉलनी येथील तर अन्य आळशी प्लॉट, अकोट फैल, खैर मोहम्मद प्लॉट, नानक नगर, इमानदार प्लॉट, समता नगर, मोमीनपुरा, रणपिसेनगर येथील रहिवासी आहेत.प्राप्त अहवाल-१६९पॉझिटीव्ह-नऊनिगेटीव्ह-१६०आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-३८७मयत-२४(२३+१),डिस्चार्ज-२२९दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३४

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाTelharaतेल्हारा