शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

CoronaVirus : संपूर्ण सर्वोपचार रुग्णालयच होणार ‘क्वारंटीन’ वार्ड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 10:58 IST

सर्वोपचार रुग्णालयात ४५० खाटांचे, तर ५० व्हेंटिलेटरचे नियोजन.

ठळक मुद्दे संभाव्य परिस्थितीशी पाहता प्रशासनाची पूर्वतयारी. ४२० खाटांसह ५० व्हेंटिलेटरची राहणार सुविधा.चौथ्या पायरीत गेल्यास आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडू शकतो.

अकोला : सध्यातरी जिल्ह्यात ‘कोरोना’चा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही; परंतु दररोज संशयित रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, संपूर्ण सर्वोपचार रुग्णालयच ‘क्वारंटीन’मध्ये बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार, सर्वोपचार रुग्णालयात ४५० खाटांचे, तर ५० व्हेंटिलेटरचे नियोजन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. असे असले तरी जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही; परंतु येणाऱ्या आठवड्यात परिस्थिती बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा प्रसार चौथ्या पायरीत गेल्यास आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडू शकतो. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. कोरोना चौथ्या टप्प्यात गेल्यास जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद््भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातील जवळपास २०० डॉक्टर्स, परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी पुरविणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. असे आहे खाटांचे नियोजनविभाग - खाटांची संख्यात्वचा व गुप्तरोग विभाग - २०मनोविकृती विभाग - २०नेत्रचिकित्साशास्त्र - २०नवीन मेडिसिन विभाग - १००जुना मेडिसिन विभाग - १४०बालरोग विभाग - ६०स्त्रीरोग विभाग - ६०-------------------------एकूण - ४२० ‘आयसीयू’मध्ये ५० खाटा४२० खाटांसह अतिदक्षता कक्षात ५० खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २० खाटा जुन्या अतिदक्षता कक्षात २० खाटा, तर नवीन अतिदक्षता कक्षात ३० खाटांचा समावेश आहे.स्त्रीरोग व बालरोग विभाग जिल्हा स्त्री रुग्णालयातसर्वोपचार रुग्णालयाला ‘क्वारंटीन’ केल्यावर आवश्यकतेनुसार, येथील बालरोग विभाग, प्रसूती व स्त्रीरोग विभाग जिल्हा स्त्री रुग्णालयात स्थलांतरित करण्याचेदेखील नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय