शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

CoronaVirus : मिटर रिडींग, बिल वितरणास ‘ब्रेक’

By atul.jaiswal | Published: March 23, 2020 2:41 PM

ग्राहकांना सरासरी वीज देयक आकरण्यात येणार असून, संकेतस्थळावर देयक पाहण्याची सुविधा असणार आहे.

ठळक मुद्दे सरासरी वीज वापराचे देयक आकारले जाईल.मोबाईल क्रमांकवर एसएमएस पाठविण्यात येणार आहेत.पुढील आदेशापर्यंत ग्राहकांचे मीटर रिडींग होणार नाही.

- अतुल जयस्वाल

अकोला : जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाला पायबंद घालण्यासाठी शासनस्तरावर आखल्या जात असलेल्या विविध उपायोजनांचाच एक भाग म्हणून महावितरणकडून आता वीज ग्राहकांचे मिटर रिडींग घेणे व वीज बिल वितरीत करण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे. या कालावधीत ग्राहकांना सरासरी वीज देयक आकरण्यात येणार असून, संकेतस्थळावर देयक पाहण्याची सुविधा असणार आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. सोमवार २३ मार्चपासून मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये. या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल आकारावे. या काळात वीज देयकांची छपाई करण्यात येणार नाही. तथापि महावितरणच्या संकेतस्थळावर विज देयक उपलब्ध करून देण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत. सोबतच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकवर एसएमएस पाठविण्यात येणार आहेत.

आॅनलाईन सुविधांचा करा वापरपुढील आदेशापर्यंत ग्राहकांचे मीटर रिडींग होणार नाही. ग्राहकांना शक्य असल्यास त्यांनी महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅपमधील ‘सेल्फ रिडींग’ सुविधेद्वारे मिटर रिडींग पाठवावे अन्यथा सरासरी वीज वापराचे देयक आकारले जाईल. तसेच छापील वीजदेयक वितरण शक्य नसल्यामुळे आपले वीजदेयक आॅनलाइन पाहावे आणि देयक भरण्यासाठी व इतर सेवांसाठी महावितरणच्या आॅनलाइन सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.सोशल डिस्टन्सींसाठी हा निर्णय घेण्यात आला असून, या कालावधीत २४ तास वीज पुरवठा सुरु ठेवण्यासाठी महावितरण प्रयत्नशिल राहणार आहे. ग्राहकांनीही आॅनलाईन सुविधांचा वापर करून वीज देयक भरावे आणि महावितरणला सहकार्य करावे. - पवनकुमार कछोट, अधिक्षक अभियंता, अकोला. 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण