शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

CoronaVirus : अकोल्यात कोरोनाबाधितांचे शतक; रुग्णसंख्या १०५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 10:50 AM

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०५ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अकोला : अकोल्यात बस्तान मांडलेल्या कोरोना विषाणूने विक्राळ रुप धारण केले असून, एकूण कोरोनाबाधितांच्या आकड्याने शुक्रवार, ८ मे रोजी शंभरचा आकडा पार केला. शुक्रवारी आणखी दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०५ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण सहा महिला (त्यात एक १२ वर्षाची मुलगी) व चार पुरुष आहेत. त्यातले आठ जण बैदपुरा येथील रहिवासी आहेत. तर एक भगतसिंह चौक माळीपूरा व अन्य एक जुने शहर येथील रहिवासी असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालावरून समोर आले आहे.रेड झोनमध्ये समावेश असलेल्या अकोला शहरातील कोरोनाबाधितांची संख्या गत आठवड्यात मोठ्या झपाट्याने वाढली आहे. गुरुवार, ७ मे रोजी दिवसभरात १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९५ वर, तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ७० वर गेला होता. त्यामध्ये शुक्रवारी आणखी दहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०५ झाली असून,सद्यस्थितीत ८० जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.

शुक्रवारी सकाळी एकून ८९ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित ७९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत अकोला शहर व त्यातही बैदपुरा हा भाग कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट बनला होता. आता शहरातील विविध भागांमध्ये रुग्ण आढळून येत असून, उगवा, अंत्री मलकापूर, व पिंजर यासारख्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ जण कोरोनामुक्त झाले असून, ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. १० जण कोविड-१९ आजाराने, तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला