शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

coronavirus : ‘कोरोना’च्या संशयिताचे केस पेपर सोशल मीडियावर व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 13:34 IST

रुग्णाचे छायाचित्र व रुग्णाचे केस पेपर सोशल मीडियावर वाऱ्यासारखे फिरले.

अकोला : अकोल्यात ‘कोरोना’चा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने शनिवारी सर्वत्र खळबळ उडाली. संशयितावर आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू असतानाच उपचारादरम्यानचे रुग्णाचे छायाचित्र व रुग्णाचे केस पेपर सोशल मीडियावर वाऱ्यासारखे फिरले. या प्रकरणाची चौकशी करावी, अशा मागणीची तक्रार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली.सर्वोपचार रुग्णालयात ‘कोरोना’च्या संशयित रुग्णावर आयसोलेशन वॉर्डात प्राथमिक उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या निदानासाठी नमुने नागपूरला पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळपासून सोशल मीडियावर रुग्णाचे छायाचित्र व प्राथमिक तपासणीचा वैद्यकीय अहवाल सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे संशयित रुग्णाची ओळख सार्वजनिक झाली असून, हा प्रकार कायद्याने गुन्हा आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी शनिवारी रात्रीच सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली.कोरोनाच्या संशयित रुग्णा बाह्यरुग्ण तपासणी अहवाल सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशा मागणीची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली आहे. रुग्णाची ओळख सार्वजनिक करणे चुकीचे आहे.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोनाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय