Coronavirus : अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ९ पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण ५१६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 20:21 IST2020-05-28T19:59:43+5:302020-05-28T20:21:52+5:30
दिवसभरात एकाचा मृत्यू व नऊ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

Coronavirus : अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ९ पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण ५१६
href='https://www.lokmat.com/topics/akola/'>अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असून रुग्ण वाढ़ीचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी आंणखी एकाचा बळी गेला आहे. तसेच ९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ५१६ रुग्ण आढळून आल्याने अकोलेकरांचा धोका आणखी वाढला आहे. वाढ़त्या समूह संक्रमणापासुन बचावासाठी नागरीकांनी स्वतः हून नियमांचे पालन करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून समूह संक्रमणाचा धोका सर्वाधिक वाढला आहे. त्यामुळे अकोलेकरांनी खबरदारी राखण्याची गरज आहे. दिवसेंदिवस कोरोना चा उद्रेक वाढत असून गुरुवारी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण ८० वर्षीय वृद्ध असून फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहे. हा रुग्ण दि.१५ रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल दि.१७ रोजी पॉझिटीव्ह आला होता. त्याचा आज उपचार घेतांना मृत्यू झाला. तसेच आंणखी 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण हा ४६ वर्षीय पुरुष असून सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी आहे.तर सायंकाळी प्राप्त आठ पॉझिटीव्ह अहवालात सहा पुरुष व दोन महिला आहेत. हे रुग्ण सनगर कॉलनी वाशीम बायपास, राऊतवाडी, गायत्रीनगर कौलखेड, सिंधी कॅम्प, कमलानेहरुनगर, हरिहरपेठ, तेलीपुरा, गोरक्षण रोड मलकापूर येथील रहिवासी आहेत. आतापर्यंत कोरोना मुळे २९ जणांचा बळी गेला आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५१६ झाली आहे. तर मृतकांचा आकडाही २५ झाला आहे. सद्यस्थितीत १४८ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. रविवारी ३४ जणांना ‘डिस्चार्ज’एकीकडे कोरोनाच्या कचाट्यात सापडणाºयांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाºयांची संख्याही वाढत आहे. ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना घरी तर उर्वरित २७ जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. १९२ अहवाल निगेटिव्ह बुधवारी दिवसभरात प्राप्त २०१ अहवाला पैकी ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत .तर १९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . अशी आहे स्थिती एकूण पॉझिटिव्ह - ५१६मृत्यू - २९कोरोना मुक्त - ३४९ॲक्टिव्ह रुग्ण - १३४ --------------