Coronavirus Akola updates : अकोल्यात आणखी ३९३ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 15:22 IST2021-03-25T15:22:11+5:302021-03-25T15:22:19+5:30
Coronavirus Akola updates : ३९३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा २५,९०७ वर पोहोचला आहे.

Coronavirus Akola updates : अकोल्यात आणखी ३९३ कोरोना पॉझिटिव्ह
अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत होण्याची कोणतीही चिन्हे नसून, गुरुवार, २५ मार्च रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १९२, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये २०१ असे एकूण ३९३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा २५,९०७ वर पोहोचला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२९३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११०१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा येथील १८ ,डाबकी रोड येथील नऊ, मोठी उमरी येथील आठ, कौलखेड, मलकापूर व जठारपेठ येथील प्रत्येकी सहा, जीएमसी व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी पाच, गंगा नगर, कुंभारी, मानकी, मुर्तिजापूर, गौरक्षण रोड व खदान येथील प्रत्येकी चार, वाशिम बायपास, माधव नगर, गीता नगर, पिंजर व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, हमजा प्लॉट, राऊतवाडी, शिवसेना वसाहत, देशपांडे प्लॉट, केशवनगर, खडकी, सिंधी कॅम्प, रेणूका नगर, बोरगाव मंजू, लहान उमरी, अकोट, तळेगाव, हुंडा, रामदासपेठ, खेळकर नगर, गायत्री नगर व खेडकर नगर येथील प्रत्येकी दोन, उर्वरित रतनलाल प्लॉट, राजेश्वर नगर, भारती प्लॉट, हरिहर पेठ, नवाबपुरा, खैर मोहम्मद प्लॉट, बेलखेळ, शिवणी, पातूर, बिहाडमाथा, दगडपारवा, सुकळी, गजानन नगर, अकोट फैल, दुर्गा चौक, एमआयडीसी, कान्हेरी गवळी, सुकोळा, महात्मा फुले नगर, स्टेशन रोड, देगाव, नकाक्षी, पारस, इनकम टँक्स आफीस, बाबुळगाव, गुडधी, पैलपाडा, वरुनदेव नगर, तुलशी नगर, खोलेश्वर, गाडगे नगर, वाशिम रोड, जूने शहर, नीमकर्दा, आलेगाव, कोठारी वाटीका, मुकूंद नगर, भगतवाडी, बाईज हॉस्टेल, व्हिएचबी कॉलनी, मेहरे नगर, खापरखेड, गोरेगाव, सातव चौक, येवता, आसरा कॉलनी, मानकर हॉस्पीटल, बाळापूर नाका, आदर्श कॉलनी, खेतान नगर, तापडीया नगर, हिंगणा रोड, बोरगाव मंजू, काटेपूर्णा, बाबुळगाव व कापसी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६,४६० ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५,९०७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १९,०१३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४३४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,४६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.