CoronaVirus in Akola : आणखी दोघांचा बळी; ७७ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 16:07 IST2020-09-14T16:06:58+5:302020-09-14T16:07:07+5:30
७७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५६९७ झाली आहे.

CoronaVirus in Akola : आणखी दोघांचा बळी; ७७ नवे पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, सोमवार, १४ सप्टेंबर रोजी आणखी दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १८३ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ७७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५६९७ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७७ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६६ अहवाल निगेटिव्ह आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ३३ महिला व ४४ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये जीएमसी येथील आठ, मलकापूर येथील सहा , मुर्तिजापूर येथील पाच, कौलखेड येथील चार, अकोट, आदर्श कॉलनी, जठारपेठ, तापडीया नगर येथील प्रत्येकी तीन, रामनगर, खडकी, गौरक्षण रोड, गीतानगर, मोठी उमरी, वाडेगाव, खदान येथील प्रत्येकी दोन, दुर्गा चौक, इडंस्ट्रीयल कोर्ट, चान्नी ता. पातूर, सुकोडा ता.अकोला, चांदूर, सोनोरी ता.मुर्तिजापूर, जयहिंद चौक, खोलेश्वर, लहान उमरी, वाशिम बायपास, रणपिसे नगर, वानखडे नगर, जूने शहर, विजय नगर, खेतान नगर, सुधीर कॉलनी, शिवाजी कॉलेजजवळ, केला प्लॉट, उदयवाडी खरप रोड, आगर, कच्ची खोली, रामदास पेठ, जोगळेकर प्लॉट, पिंजर, कृषी नगर, सिव्हील लाईन, दहिहांडा व दोंडगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
अकोला व शिरसो येथील दोन रुग्णांचा मृत्यू
सोमवारी आणखी दोघांचे मृत्यू झाले. यामध्ये डाबकी रोड, अकोला येथील ६० वर्षीय महिला व शिरसो, ता. मुर्तिजापूर येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे ९ व १० सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
१२८८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५६९७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४२२६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १८३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १२८८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.