शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

CoronaVirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; ३४ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ५३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 19:16 IST

सोमवार, १५ जून रोजी दिवसभरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली.

ठळक मुद्दे३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५३ वर गेला आहे. एकूण बाधितांची संख्या १०४१ झाली आहे.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर कमी होण्याची कोणतीच चिन्हे नसून, या आजाराला बळी पडणाऱ्यांची व बाधित होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. सोमवार, १५ जून रोजी दिवसभरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. तर आणखी ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५३ वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १०४१ झाली आहे.विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. रविवार, १४ जूनला जिल्ह्यात कोरोनाबळींचे अर्धशतक गाठले, तर कोरोनाबाधितांच्या संख्या हजाराचा टप्पा ओलांडत १००७ झाली होती. यामध्ये सोमवारी आणखी ३४ जणांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी एकूण १४३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३४ पॉझीटिव्ह, तर उर्वरित १०९ निगेटिव्ह आहेत. सकाळी शिवसेना वसाहत, तार फैल व शिवाजीनगर येथील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर सायंकाळी ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले. त्यात १३ महिला तर १८ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये सिंधी कॅम्प येथील नऊ, बाळापूर येथील चार, चांदूर येथील तीन, खदान येथील दोन, जीएमसी होस्टेल येथील दोन, तर आदर्श कॉलनी, डाबकी रोड, शिवाजी नगर, हिंगणा , रणपिसे नगर, रामदास पेठ, अकोट फैल, बार्शीटाकळी, शिवनी, अंबिकानगर, गंगानगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

आणखी दोन दगावलेसोमवारी दोघांच्या मृत्यू नोंद झाली. यापैकी शिवाजी नगर येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १२ जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. तर सोमवार दुपारी फिरदौस कॉलनी येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांना २ जून रोजी दाखल करण्यात आले होते.

आणखी २१ जणांना डिस्चार्जसोमवारी २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात १६ जणांना घरी सोडण्यात आले. तर पाच जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात  नऊ महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे.  त्यात खदान येथील चार, सिंधी कॅम्प येथील चार, रामदास पेठ येथील दोन तर  विजय नगर, गुलजार पुरा, कौलखेड, सावकारनगर, भारती प्लॉट,  शास्त्री नगर, सोनटक्के प्लॉट,  कमला नेहरु नगर,  कैलास टेकडी,  जीएमसी क्वार्टर, नायगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. 

३३० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआता सद्यस्थितीत १०४१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ५३ जण (एक आत्महत्या व ५२ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ६५८ आहे. तर सद्यस्थितीत ३३० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.

 

प्राप्त अहवाल-१४३पॉझिटीव्ह-३४निगेटीव्ह-१०९

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०४१मयत-५३(५२+१),डिस्चार्ज-६५८दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३३०

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या